शनाया कपूर करतेय आपल्या कॉलेजमधल्या मित्राला डे...

शनाया कपूर करतेय आपल्या कॉलेजमधल्या मित्राला डेट (Shanaya Kapoor is dating her college sweetheart)

अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर सिंगल नसल्याचे बोलले जात आहे. लवकरच अभिनयाच्या दुनियेत प्रवेश करणारी शनाया कपूर आपल्या कॉलेजमधील मित्राला डेट करत आहे.

अभिनेता संजय कपूर आणि ज्वेलरी डिझायनर महीप कपूर यांची मुलगी शनाया कपूरने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेले नाही, परंतु तरीही ती कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कधी गर्ल गँग अनन्या पांडे आणि सुहाना खानसोबत केलेल्या पार्ट्यांमुळे, तर कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे, शनाया सोशल मीडियावर चर्चेत राहते.

शनाया कपूर आता सिंगल नाही. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय शनाया कपूर मुंबईत राहणाऱ्या करण कोठारीला डेट करत आहे. शनाया आणि तिचा कथित बॉयफ्रेंड करण कोठारी यांच्यात नक्की काय चालू आहे याबद्दल कोणालाच माहित नाही. शनायासोबत कॉलेजमध्ये शिकलेल्या करण कोठारीचा बॉलिवूडशी कोणताही संबंध नाही. करणचे लॉस एंजेलिसमध्ये स्टार्टअप आहे. शनायाने अद्याप आपल्या बॉयफ्रेंडसोबतची कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलेली नाही.

तसेच शनायाने याबाबत अद्याप काहीही सांगितलेले नाही. पण दोघेही अनेकदा बॉलिवूड पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात. पार्ट्यांमध्ये शनाया करणची आपला पार्टनर म्हणून ओळख करून देते.

याबाबत दोघांनीही मौन बाळगल्याचं सूत्रांकडून समजलं आहे, दोघेही एकत्र खूप क्यूट दिसत आहेत. शनाया कपूर आणि करण कोठारी यांच्या डेटिंगच्या बातम्या इंडस्ट्रीत पसरत आहेत, परंतु दोघांनीही याबाबत मौन बाळगले आहे.