शनाया कपूरच्या पारदर्शक कपड्यांतील हॉट लूकवर चा...

शनाया कपूरच्या पारदर्शक कपड्यांतील हॉट लूकवर चाहते फिदा (Shanaya Kapoor Flaunts Her Perfectly Toned Body in Style)

अनिल कपूरची भाची आणि संजय कपूरची मुलगी, शनाया कपूरने आपलं सोशल अकाऊंट सगळ्यांसाठी खूले केल्यापासून सोशल मीडियावर तिने आपला गवगवा निर्माण केला आहे. या प्लॅटफॉर्मवर तिचे भरपूर फॅन फॉलोविंग आहेत. शनाया कपूरच्या बोल्ड आणि सेक्सी फोटोंनी चाहत्यांचं मन जिंकलं आहे. असेच काही फोटो शनयाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत, जे पाहताना चाहत्यांची फोटोंवरून नजर हटत नाहीये.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

पारदर्शक कपड्यांमधील शनायाचा हॉट अवतार सोशल मीडियावर कमाल करत आहे. शनयाने चाहत्यांना वेड लावलं आहे.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

शनाया कपूरने आपल्या या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाची बिकिनी घातली असून त्यावर पारदर्शक कपडा लपेटलेला दिसत आहे. सोबतच शनयाने एक मोठ्ठी हॅटही छान कॅरी केली आहे.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

शनाया कपूर लवकरच हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. परंतु चित्रपटात येण्यापूर्वी सोशल मीडियावर ती आपले फॅन फॉलोविंग वाढवू इच्छित आहे. म्हणूनच काही महिन्यांपूर्वीच तिने आपले खासगी सोशल अकाऊंट सर्वांसाठी खुले केले असून त्यावर एका मागून एक बोल्ड फोटो ती शेअर करत आहे.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

अनेक स्टार्स किड्‌सना संधी देऊन त्यांचे करिअर बनविणारा करण जौहर, आता शनाया कपूरला चित्रपटात लॉन्च करण्याची तयारी करत आहे. लवकरच त्यासंबंधी करण घोषणा करणार असल्याचे समजते. खरंतर मागच्या वर्षीच शनया चित्रपटात डेब्यू करणार होती परंतु लॉकडाऊनमुळे ते शक्य झाले नाही.