शमशेरा रिलीज होण्याआधीच शर्ट न घातलेला रणबीर कप...

शमशेरा रिलीज होण्याआधीच शर्ट न घातलेला रणबीर कपूर आणि पारदर्शक ड्रेसमध्ये वाणी कपूरचे उत्तेजित करणारे हॉट फोटोशूट (Shamshera: Ranbir Kapoor And Vaani Kapoor’s Sensual Photoshoot, Fans Say- Too Hot To Handle…Bhai Shadi Ho Gai Ab Bas Karo)

अभिनेता  रणबीर कपूर ४ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एका बिग बजेट चित्रपटात दिसणार आहे. रणबीरचा शमशेरा या चित्रपटाचे प्रमोशन सध्या जोरदार चालू आहे. रणबीर सोबत या चित्रपटात अभिनेत्री वाणी कपूर दिसणार असल्यामुळे ती सुद्धा या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतेच वाणी आणि रणबीरने एक अतिशय बोल्ड फोटोशूट केले. या फोटोशूटचे फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. या फोटोतील रणबीर आणि वाणीची केमिस्ट्रीही त्यांच्या चाहत्यांना खूप आवडली आहे. हा चित्रपट 22 जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. पण चित्रपटाचा ट्रेलर आधीच हिट झाला आहे.

या फोटोंमध्ये, रणबीरने लाल कोट घातला आहे जो समोरुन  उघडा आहे. या उघड्या कोटमधून रणबीरची फिट बॉडी स्पष्टपणे दिसत आहे, तर वाणी कपूरने काळ्या रंगाचा पारदर्शक ड्रेस घातला आहे. या ड्रेसमध्ये ती खूप मादक आणि सेक्सी दिसत आहे. या जाळीदार ड्रेसवर वाणीचा स्मोकी मेकअप केला आहे. फोटोशूट दरम्यान दोघांनीही खूप कामुक पोझ दिल्या आहेत.

रणबीरचे वाणीसोबतचे फोटो पाहून त्याच्या चाहत्यांनी त्याला कमेंट करत, तुझे लग्न झाले आहे अशी आठवण करुन दिली आहे. तर आणखी एका युजरने आलिया हे फोटो पाहून तुझा पत्ता शोधत आहे अशी कमेंट केली.

या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर रणबीर यात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाची कथा एका आदिवासी डाकूवर आधारित आहे. या चित्रपटात संजय दत्त आणि वाणी कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

वाणीने हे फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर  शेअर केले. शमशेरा चित्रपटात रणबीर बल्ली तर वाणीने सोना ही भूमिका साकारली आहे. चाहत्यांना फोटोंमध्ये त्यांची केमेस्ट्री आवडल्यामुळे या दोघांना चित्रपटात पाहण्यासाठी ते उत्सुक आहेत.