डॉक्टरशी लग्न ही निव्वळ अफवा:शमा सिकंदरचा खुलास...

डॉक्टरशी लग्न ही निव्वळ अफवा:शमा सिकंदरचा खुलासा (Shama Sikandar Denies Marriage Rumours)

बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा पसरत असतात. या अफवांना अनेक बॉलिवूड कलाकार बळी पडतात. असेच एकदा अभिनेत्री शमा सिकंदर बॉलिवूडच्या अफवांना बळी पडली होती. काही वर्षांपूर्वी अभिनेत्रीने एका डॉक्टरशी लग्न केले आहे आणि त्यांना एक मूल असल्याची बातमी सर्वत्र पसरली होती. या गोष्टीकडे सुरुवातीला शमाने दुर्लक्ष केले पण नंतर तिने आपले मौन सोडले आणि सांगितले की, व्हायरल झालेला फोटो माझ्या भाचीचा आहे आणि मी कोणत्याच डॉक्टरशी लग्न केलेले नाही. 

शमाने असेही सांगितले की, मी कधीही आपले नाते लपवण्याचा प्रयत्न केला नाही. मी डॉक्टरांशी लग्न केले आहे आणि मला एक मूलही आहे अशा अफवा पसरल्या होत्या. कारण माझा माझ्या भाचीसोबत फोटो छापण्यात आला होता. आणि लोकांना ती माझी मुलगी असल्याचा गैरसमज झाला. त्यामुळेच ती माझ्या भावाची मुलगी आहे हे मला स्पष्ट करावे लागले. शमा पुढे म्हणाली की, त्यावेळी अनेक अभिनेत्रींचे डॉक्टरांसोबत लग्न झाले होते, त्यामुळे माझ्याबद्दलही या अफवा पसरवण्यात आल्या होत्या. शमा नेहमी लोकांना सांगायची की ती जेव्हाही रिलेशनशिपमध्ये येईल तेव्हा ती कोणापासून लपवणार नाही.

पती जेम्स मिलिरॉनसोबत डेटिंग करण्याबाबत शमा सिकंदरने सांगितले की, ती नेहमीच मनमोकळी राहते. एकदा एका मीडियामधल्या व्यक्तीने मला जेम्सबद्दल विचारले, कारण त्यांना आम्ही दोघेही एकत्र दिसलो होतो. तेव्हा मी जेम्स माझा बॉयफ्रेंड असल्याचे रिपोर्टरला सांगितले होते.

शमाच्या मते, तिने तिच्या नात्याबद्दल खुलासा केल्यानंतर अनेक अभिनेत्री आपल्या जोडीदारांबद्दल मीडियासमोर मनमोकळेपणाने बोलू लागल्या. नाहीतर आधी त्या स्वतःला सिंगल म्हणायच्या किंवा कोणी विचारल्यावर आम्ही फक्त चांगले मित्र आहोत असे तरी म्हणतात.