रिलीजच्या आधीच ‘बाहुबली 2’ च्या वरताण ठरलाय ‘शक...

रिलीजच्या आधीच ‘बाहुबली 2’ च्या वरताण ठरलाय ‘शक्तीमान’ (‘Shaktiman’ Toppers More Than ‘Bahubali 2’ ,Before Release )

90 च्या दशकातील मुलांना मनोरंजनासाठी फार सुंदर टीव्ही शो उपलब्ध होते. त्यात नॉडी, करिश्मा का करिश्मा, शका-लाका बूमबूम, शरारत अशा मालिकांचा समावेश होता. या अलिकडच्या मालिका आहेत. पण लहान मुलांना सुपर हिरोंचे वेड हे त्याही आधीपासून होते. सध्याच्या मुलांच्या तोंडात स्पायडरमॅन, सुपरमॅन, बॅटमॅन अशा सुपरहिरोंची नावे असतात. पण 90 च्या दशकातील लहान मुलांचा एकच सुपरहिरो होतो तो म्हणजे शक्तीमान. त्याकाळी या मालिकेने लहान मुलांना वेड लावले होते. प्रत्येक लहान मुलाला आपण अडचणीत सापडल्यावर आपल्याला सोडवायला शक्तीमान यावा असेच वाटायचे.

90 च्या दशकातील मुलांसाठी आता एक खूश खबर आहे. ते म्हणजे त्यांचा लाडका सुपरहिरो लवकरच त्यांना आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. टीव्ही मालिका गाजवल्यानंतर शक्तीमान आता मोठा पडदा गाजवायला सज्ज झाला आहे. पण शक्तीमान कोण साकारणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काहींच्या मते ही भूमिका ह्रतिक रोशन साकारणार आहे. तर काहींच्या मते अभिनेता अल्लू अर्जून किंवा रणवीर सिंह गंगाधरच्या भूमिकेत दिसू शकतात.

अजून तरी निर्मात्यांकडून कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही. पण या चित्रपटाच्या बजेटसंबंधी मोठी बातमी समोर आली ती म्हणजे या चित्रपटाच्या बजेटने बाहुबली 2 चित्रपटालासुद्धा मागे टाकले आहे. बाहुबली 2 चित्रपटाचे बजेट 250 करोड रुपये होते तर शक्तीमानचे बजेट 300 करोडच्या आसपास असणार असल्याचे म्हटले जाते.