श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला ड्रग्स प्रकर...

श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला ड्रग्स प्रकरणी अटक, बंगलुरू येथील रेव पार्टीत ड्रग्स घेतल्याचा संशय (Shakthi Kapoor’s son Siddhanth Kapoor detained after testing positive for drugs at rave party in Bengaluru)

बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरला बंगलुरू पोलिसांनी अटक केली आहे. बंगलुरू पोलिसांनी एमजी रोड येथील हॉटेल पार्कच्या पबमध्ये होणाऱ्या रेव पार्टीवर धाड टाकली. या पार्टीत सिद्धांतला डीजे म्हणून बोलावले होते.

पार्टीत ड्रग्स घेतल्याचा सिद्धार्थवर आरोप आहे. त्याच्यासोबत आणखी ६ जणांची ड्रग्स टेस्ट पॉजिटिव्ह आली. याप्रकरणी सिद्धांतचे वडील शक्ती कपूर यांना विचारले असता, ”मी केवळ एकच सांगू शकतो की हे शक्य नाही” असे ते म्हणाले .

पोलिसांनी ताब्यात घेतलेले संशयित आरोपी ड्रग्स घेऊन पार्टीत आलेले की हॉटेलमध्ये जाऊन त्यांनी ड्रग्स घेतले हे अजून स्पष्ट झालेले नाही असे बंगलुरु सिटी ईस्ट डिवीजनचे डीसीपी डॉ. भीमशंकर यांनी सांगितले. सध्या सगळ्या आरोपींना उलसूर पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहे.

यापूर्वी अभिनेता सुशांत सिहं राजपूत ड्रग्स केस प्रकरणात नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरोने अभिनेत्री श्रद्धा कपूरला सुद्धा चौकशीसाठी बोलावले होते. पण तिच्या विरुद्ध कोणतेच ठोस पुरावे सापडले नाहीत. या प्रकरणी सप्टेंबर २०२० मध्ये एका व्हॉटस् अप चॅटमध्ये श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि दीपिका पादुकोणचे नाव समोर आले होते. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले.

सिद्धांत कपूर हा बॉलिवूड अभिनेते शक्ति कपूर यांचा मुलगा आहे. त्याने त्याच्या करियरची सुरुवात १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या जुडवा या चित्रपटातून केली होती. त्यानंतर त्याने अगली, जज्बा, हसीना पारकर, पलटन, हॅलो चार्ली आणि चेहरे या चित्रपटांत काम केले. याशिवाय त्याने भौकाल या वेबसीरिजमध्ये सुद्धा काम केले.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम