माजी तारक मेहता उर्फ शैलेश लोढाने साधला दिग्दर्...

माजी तारक मेहता उर्फ शैलेश लोढाने साधला दिग्दर्शक असित मोदीवर निशाणा (Shailesh Lodha Cryptic Post Amid Sachin Shroff Casting As Taarak Mehta Targets Asit Modi)

तारक मेहता का उल्टा चष्मा या लोकप्रिय टीव्ही मालिकेतील तारक मेहता उर्फ ​​शैलेश लोढा सध्या चर्चेत आहेत. गेल्या १५ वर्षांपासून शैलेश लोढा या मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारत होते. पण दिग्दर्शक असित मोदी यांच्यासोबतच्या मतभेदामुळे शैलेश लोढा यांनी मालिका मध्येच सोडली. आता शैलेशच्या जागी टीव्ही इंडस्ट्रीतील सुप्रसिद्ध अभिनेता सचिन श्रॉफला घेण्यात आले आहे. दरम्यान शैलेश लोढा यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे, ही पोस्ट वाचून शैलेशने मालिकेचे दिग्दर्शक असित मोदी यांच्यावर निशाणा साधल्याचे म्हटले जात आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेत तारक मेहताची भूमिका साकारणाऱ्या शैलेश लोढा यांनी या मालिकेला रामराम केला. त्यांच्या जाण्यानंतर आता लोकप्रिय अभिनेता सचिन श्रॉफ या शोमध्ये तारक मेहताची भूमिका साकारत आहे. अशातच जुन्या तारक मेहताने मालिकेच्या दिग्दर्शकाचे नाव न घेता एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शैलेशने निर्मात्यावर निशाणा साधला असून आता ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टमध्ये शैलेश लोढा यांनी नकळत बरेच काही सांगितले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. या पोस्टमध्ये शैलेश लोढा यांनी मालिकेच किंवा इतर कोणत्याही व्यक्तीचे नाव घेतलेले नाही. पण, पोस्ट पाहून  शैलेश लोढा यांनी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या दिग्दर्शकांना कुठेतरी टार्गेट केल्याचा प्रत्येकजण अंदाज लावत आहे .

शैलेश लोढा यांनी सोशल मीडियावर स्वतःचा एक हसतानाचा फोटो शेअर केला आहे. ही पोस्ट शेअर करत अभिनेत्याने कॅप्शन दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शैलेशने हा शो सोडू नये अशी दिग्दर्शक असितकुमार मोदींची इच्छा होती पण शैलेशने त्यांचे काही ऐकले नाही आणि त्यांनी हा शो मध्येच सोडला त्यामुळे असितकुमार मोदी शैलेश लोढावर नाराज झाले.