शाहरुख खानची मुलगी आणि अमिताभ बच्चनचा नातू करती...

शाहरुख खानची मुलगी आणि अमिताभ बच्चनचा नातू करतील पडद्यावर रोमान्स (Shahrukh’s Daughter and Amitabh’s Grandson Will Romance on Screen)

बॉलिवूडची सुप्रसिद्ध दिग्दर्शिका झोया अख्तर हिने तिच्या आगामी ‘द आर्चीज’ चित्रपटाची घोषणा केली आहे. झोया हा चित्रपट कॉमिक्सच्या धर्तीवर घेऊन येत असल्याचे सांगितले जात आहे, ज्याचा स्क्रीनशॉट तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केला आहे. या चित्रपटाच्या घोषणेबरोबरच अगस्त्य नंदा, सुहाना खान आणि खुशी कपूर हे स्टार किड्‌स झोया अख्तरच्या या चित्रपटातून डेब्यू करणार असल्याचीही बातमी समोर येत आहे. रिपोर्टनुसार, या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा नातू आणि शाहरुख खानची मुलगी पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहेत.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये, झोया अख्तरने चित्रपटाच्या स्टार कास्टचा खुलासा केलेला नाही, परंतु सुहाना खान, अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर या चित्रपटात मुख्य भूमिकेत असतील असे वृत्त आहे. परंतु, या बातमीबाबत झोयाच्या बाजूने कोणतेही अधिकृत विधान आलेले नाही किंवा स्टार किड्सकडून देखील कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

वास्तविक, गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अशा बातम्या व्हायरल होत आहेत की झोया अख्तर या स्टार किड्सना तिच्या चित्रपटातून लॉन्च करण्याच्या मूडमध्ये आहे. तथापि, झोयाने तिच्या सोशल मीडिया पोस्टद्वारे निश्चितपणे सांगितले आहे की, हा चित्रपट किशोरवयीन मित्रांच्या कथेवर आधारित असेल, ज्यामध्ये चार मित्रांमधील प्रेम त्रिकोण दाखवला जाईल. झोयाची सोशल मीडिया पोस्ट पाहिल्यानंतर चाहते आर्ची गँगच्या या देसी व्हर्जनची आतुरतेने वाट पाहत आहेत. या प्रकल्पासाठी झोयाने रीमा कागतीसोबत हातमिळवणी केली आहे.

फोटो सौजन्य: इन्स्टाग्राम

झोया अख्तरने इन्स्टाग्रामवर एका पोस्टद्वारे तिच्या ‘द आर्चीज’ चित्रपटाची घोषणा करताच तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. अनेक सेलिब्रिटींनी कमेंट करून या चित्रपटाबद्दलची उत्सुकता दाखवली आहे. सोनाक्षी सिन्हा, दीपिका पदुकोण यांसारख्या अनेक सेलिब्रिटींनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. झोयाने तिच्या एका निवेदनात असेही म्हटले आहे की, आर्ची कॉमिक्स हा तिच्या बालपण आणि पौगंडावस्थेतील महत्त्वाचा भाग होता, या कॉमिक्सच्या पात्रांना जगभरातील लोकांचे प्रेम मिळाले.

विशेष म्हणजे सुहाना खानला तिचे वडील शाहरुख खानप्रमाणे फिल्मी दुनियेत नाव कमवायचे आहे. हिरोईन बनण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुहाना न्यूयॉर्कमध्ये अभिनयाचे शिक्षण घेत आहे. काही शॉर्ट फिल्म्समध्ये काम केलेल्या सुहानाने २०१८ मध्ये मॅगझिन कव्हरवर पदार्पण केले. सुहाना खान सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. मात्र, बिग बींचा नातू आणि किंग खानच्या मुलीला ऑनस्क्रीन रोमान्स करताना पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत.