पठाण चित्रपटातील शाहरुखचे अॅब्स चाहत्यांना जरी ...

पठाण चित्रपटातील शाहरुखचे अॅब्स चाहत्यांना जरी आवडले असले तरी ते दाखवायला खूप लाजायचा किंग खान (Shahrukh’s Abs Won The Hearts Of Fans In Pathan, But King Khan Was Too Shy To Show Them)

सध्या शाहरुख खान आपल्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्याने खळबळ उडवून लोकप्रियता मिळवली आणि आता या चित्रपटातील दुसरे गाणे ‘झूमे जो पठाण’ रिलीज झाले आहे. या गाण्याने चाहत्यांनाही नाचायला भाग पाडले आहे. हे या चित्रपटाचे शीर्षक गीत आहे, हे गाणे रिलीज झाल्यानंतर अवघ्या दोन तासांतच त्याला 20 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. या गाण्यातही शाहरुख खानने आपल्या अॅब्सचे प्रदर्शन केले आहे, त्याचे अॅब्स लोकांना खूप आवडत आहेत. पण शाहरुख खान आपले अॅब्स दाखवायला खूप लाजात होता. गाण्याच्या कोरिओग्राफरने आपल्या एका पोस्टद्वारे याचा खुलासा केला आहे.

झूमे जो पठाण या चित्रपटाच्या शीर्षक गीतामध्ये, किंग खानने आपल्या अ‍ॅब्सचे प्रदर्शन करताना आपली सिग्नेचर पोज दाखवली. या गाण्याचे कोरिओग्राफर बॉस्को मार्टिसने शाहरुख खानसोबतची एक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्याने शाहरुख खानला पडद्यावर हे करताना किती लाज वाटली हे सांगितले आहे.

इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करताना बॉस्कोने लिहिले की, “हे फोटो खरोखरच माझ्या इन्स्टा पेजवरील सर्वोत्तम फोटो आहेत. मी खूप भाग्यवान आहे की मला हा फोटो तुमच्यासोबत क्लिक करायला मिळाला. मला माहित आहे की हे क्लिक करताना तुम्हाला किती लाज वाटली होती. आणि सर, गाण्यातही तुम्ही तुमचे अ‍ॅब्स दाखवायला खूप लाजात होता. हा क्षण माझ्यासाठी आयुष्यभराच्या खजिन्यापेक्षा कमी नाही. त्या डान्स मूव्हज तुम्ही इतक्या अप्रतिम पद्धतीने केलात तसेच या फोटोमध्ये पोझ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.

शाहरुख खान व्यतिरिक्त कोरिओग्राफर बॉस्कोने दीपिका पादुकोणसाठी सुद्धा एक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी लिहिले आहे की, “तुझ्यासारखे कोणी नाही. तू सर्वात ग्लॅमरस, सर्वात चमकणारी स्टार आणि सुपर हॉट आहेस.”

चित्रपटाच्या शीर्षक गीतापूर्वी ‘बेशरम रंग’ हे गाणे रिलीज झाले होते, हे गाणे लोकांना इतके आवडले की ते बरेच दिवस यूट्यूबवर ट्रेंडिंग लिस्टमध्ये होते. गाण्याबाबत बराच गदारोळ झाला, ही वेगळी बाब असली तरी लोकांनी शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणला प्रचंड ट्रोल केले, पण प्रत्यक्षात हे गाणे लोकांना खूप आवडले. ‘पठाण’ चित्रपट 23 जानेवारी 2023 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण व्यतिरिक्त जॉन अब्राहम देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.