शाहरुख – सलमान – आमीर – प्रियंका हे सितार...

शाहरुख – सलमान – आमीर – प्रियंका हे सितारे जाचक अटी घालून सिनेमा स्वीकारतात (Shahrukh – Salman – Aamir; These Stars Accept The Film Only On Their Conditions : Know Their Strange Conditions)

सर्वसाधारणपणे चित्रपट निर्माता सांगेल त्याप्रमाणे कलाकार मंडळींना वागावं लागतं, परंतु काही वेळा या उलट होताना दिसतं. म्हणजे काही स्टार मंडळी निर्मात्यांना जाचक अटी घालून सिनेमा स्वीकारतात. अशा कलाकारांमध्ये बॉलिवूडमधील तीन सुपरस्टार खान आणि इतरही काही नट आणि नट्या आहेत. जाणून घेऊयात हे कलाकार कोण आहेत आणि त्यांच्या अटी काय असतात?

शाहरुख खान

फोटो सौजन्य – इंस्टाग्राम

बॉलिवूडचा बादशहा अर्थात किंग खानची निर्मात्यांकडे काय मागणी असते हे जाणून तुम्हाला गंमत वाटेल. रोमांसच्या या किंगला घोड्याची भिती वाटते. त्यामुळे कोणताही चित्रपट स्वीकारताना त्याची निर्मात्यांकडे अशी मागणी असते की, त्या चित्रपटामध्ये घोडेस्वारी करावी लागेल असा सीन असू नये.

सलमान खान

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

सलमान खानचं स्टारडमच असं आहे की केवळ त्याच्या नावाने त्याचे चित्रपट करोडोंची कमाई करतात. नुकताच प्रदर्शित झालेल्या अंतिम चित्रपटाचं उदाहरण आपल्यासमोर आहे. त्याचे चाहते वेड्यासारखं त्याच्यावर प्रेम करतात. मात्र सलमानबाबत एक गोष्ट जगजाहिर आहे की, तो चित्रपटांमध्ये कधीही किसिंग सीन देत नाही. आपल्या याच अटीवर सलमान सिनेमा स्वीकारतो. आणि म्हणूनच सलमानला ज्या चित्रपटांसाठी विचारलं जातं त्यात कोणताही किसिंग सीन असत नाही.

आमिर खान

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान चित्रपटांबाबत फारच चुझी आहे. उत्तम स्क्रिप्ट असणारे मोजके चित्रपट निवडण्यासाठी तो प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर आमिर खानला चित्रपटात ‘लो अँगल शॉट्स’ अजिबात आवडत नाहीत. तो कोणताही चित्रपट या अटीवर स्वीकारतो की त्यात ‘लो अँगर शॉट’ नसेल.

अक्षय कुमार

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

फिटनेस प्रेमी अक्षय कुमार हा कुटुंबवत्सल आहे. तो कोणत्याही परिस्थितीत आपला फिटनेस आणि कुटुंब यांच्याबाबत तडजोड करत नाही. आणि म्हणूनच कोणताही सिनेमा स्वीकारताना तो निर्मात्यांना आधीच सांगतो की, तो रविवारी आणि रात्री उशिरापर्यंत शुटींग करणार नाही.

हृतिक रोशन

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

प्रत्येक गोष्टीत परफेक्ट असलेला हृतिक स्वतःला सुदृढ आणि निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम आणि आहाराचे काटेकोरपणे पालन करतो. अन्‌ सिनेमाच्या शुटिंग लोकेशन साइटवर जिमची सोय असावी आणि तेथेही आहाराचे काटेकोरपणे पालन व्हावे याकरिता स्वतःच्या खाजगी शेफला सोबत ठेवण्याची परवानगी असावी, या अटींवर हृतिक सिनेमा स्वीकारतो.

कंगना रणौत

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

बेताल वक्तव्यासाठी सुपरिचीत बॉलिवूड क्वीन कंगना रणौत कोणताही सिनेमा साइन करण्यापूर्वी निर्मात्याकडे स्वतःसाठी एक पर्सनल असिस्टंडची मागणी करते. या व्यतिरिक्त तिची दुसरी अट अशी असते की, जोपर्यंत तिचे पूर्ण पैसे तिच्या खात्यामध्ये येत नाहीत, तोपर्यंत चित्रपट प्रदर्शित करायचा नाही.

करीना कपूर खान

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

बॉलिवूडची बेबो करीना कपूर खान फक्त नामांकित अभिनेत्यांसोबतच काम करते. ती ज्या अभिनेत्यासोबत काम करणार असेल तो नुसता हुशार असून चालत नाही, तो लोकप्रिय असेल तरच करीना तो सिनेमा स्वीकारते.

प्रियंका चोप्रा

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

देसी गर्ल प्रियंका चोप्राने बॉलिवूड ते हॉलिवूड पर्यंतचा प्रवास यशस्वीरित्या केलेला आहे, मात्र ही तारका कोणताही सिनेमा स्वीकारण्यापूर्वी, ती चित्रपटामध्ये न्यूड सीन देणार नसल्याचे स्पष्टपणे सांगते. निर्मात्यांना मान्य असेल तरच ती चित्रपट साइन करते.