शाहरुख खानचा लेक अबराम खान आठ वर्षांचा झाला (Sh...

शाहरुख खानचा लेक अबराम खान आठ वर्षांचा झाला (Shahrukh Khan’s Youngest Son Abram Khan Turns 8; See Cute Photos of Abram Khan)

शाहरुख खानच्या लाडक्या लेकाचा म्हणजेच अबराम खानचा आज आठवा वाढदिवस आहे. २०१३ सालात सरोगसीच्या मदतीने अबरामचा जन्म झाला. शाहरुख खान आणि गौरी खान यांचं हे शेंडेफळ जन्मल्यापासून काही ना काही कारणाने प्रकाशझोतात आहे. स्टार किडस्‌मध्ये देखील अबरामची कायमच चर्चा होत असते. जाणून घेऊया अबराम खानबद्दल काही गोष्टी…

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

अबराम खानचा जन्म २७ मे २०१३ ला झाला. त्याच्या जन्माच्या वेळी शाहरुख पन्नाशीचा होता. त्यामुळे अबरामच्या जन्माची खबर ऐकल्यानंतर चाहतेही अवाक्‌ झाले होते. तरीही अबराम सतत आपल्या क्युटनेस आणि स्टाईलमुळे लोकांची मनं जिंकत असतो.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

फोटो सौजन्य:इंस्टाग्राम

अबराम खानच्या जन्माच्या वेळेस अशाही वावड्या उठल्या होत्या की, आर्यन हा डिट्टो त्याच्या बाबासारखाच दिसतो. त्यामुळे शाहरुखला आर्यनकडून फार अपेक्षा नव्हत्या. आणि अनुवांशिकतेचा विचार करता त्याला असं मुल हवं होतं ज्याची स्टार व्हॅल्यू अधिक असेल.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

अबराम खानचं नाव ठेवल्यानंतर त्याच्या नावावरून देखील वाद निर्माण झाला. त्याच्या नावामध्ये ‘राम’ हा शब्द आल्यामुळे त्याच्या नावाचा वाद धर्माशी जोडला गेला. हा वाद मिटवण्यासाठी अबरामची आई गौरी खानला मीडियासमोर येऊन, हा वाद इथेच मिटवला पाहिजे असे सांगावे लागले.

शाहरुख खानचा धाकटा मुलगा अबराम खान

फोटो सौजन्य:इंस्टाग्राम

अबरामच्या जन्माच्या वेळेस शाहरुख खानवर एकामागोमाग एक असे आरोप केले गेले. ‘अबराम’च्या जन्माच्यावेळी त्याच्यावर लिंग निदान चाचणी केल्याचा आरोप केला गेला होता. या आरोपामुळे खळबळ उडाली होती. या आरोपातून सावरणे शाहरुखसह त्याच्या कुटुंबाला कठीण झाले होते. त्याबाबत बोलताना शाहरुखने सांगितले होते की, मी सुशिक्षित असल्याने अशा प्रकारचा मूर्खपणा कधीच करणार नाही.

फोटो सौजन्य:इंस्टाग्राम

आधीच दोन मुलं असताना एवढ्या उशिरा तिसऱ्या मुलाचा का विचार केला? असे चाहत्यांना वाटत होते आणि त्यातच सरोगसीची खबर लागताच त्यांना अबरामच्या आईबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता लागली होती. मग गौरी खानच्या वहिनीनेच सरोगसीने अबरामला जन्म दिला असल्याची खबर सर्वत्र पसरली. या वादापासून वाचण्याकरिता गौरीचा भाऊ आपल्या पत्नीला पाहायला हॉस्पिटलमध्येही गेला नव्हता, असं कळलं होतं.

फोटो सौजन्य:इंस्टाग्राम

.

अबराम खानच्या बाबतची सगळ्यात मोठी बाब समोर आली, ती अशी होती की – अबराम खान हा शाहरुख खानचा मुलगा नसून, तो आर्यन खानच्या प्रेमाची निशाणी आहे. या वक्तव्यास उत्तर देताना शाहरुखने म्हटलं होतं की, मी अशाप्रकारच्या वागण्याची कल्पनाही कधी करू शकलो नाही. खरं म्हणजे आयर्न खानचा एका मुलीसोबत वेगाने गाडी चालवतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतरच अशाप्रकारच्या चर्चेस ऊत आला होता. पण यामुळे नाराज झालेल्या शाहरुखने अशाप्रकारच्या वक्तव्यावर हरकत घेतली होती.

फोटो सौजन्य:इंस्टाग्राम

अबराम खान आत्तापासून एवढ्या लहान वयात चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय किडस्‌मध्ये गणला जातो. शाहरुख बरेचदा आपल्या मुलासोबत दिसतो. ईदचं निमित्त असो वा एखादं सुट्टीतील डेस्टिनेशन शाहरुखसोबत अबरामला स्पॉट केलं जातं. तसं पाहिलं तर शाहरुख आणि गौरी खान यांची तीन मुलं आहेत – सुहाना खान, आर्यन खान आणि अबराम खान. परंतु या तिघांपैकी अबराम हा सर्वाधिक चर्चेत असतो. सोशल मीडियावरही अबरामचे फोटो अनेकदा व्हायरल होताना दिसतात.

फोटो सौजन्य:इंस्टाग्राम

बॉलिवूड सेलिब्रिटींच्या मुलांवर प्रेक्षकांचे खूप लक्ष असते. सोशल मीडियावर तर या स्टार किड्सबाबत जोरदार चर्चा होत असते. जर हा मुलगा बॉलिवूडचा किंग खान अर्थात अभिनेता शाहरुख खानचा असेल तर चर्चा होणारच.