शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने नाकारल्या मोठ...

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने नाकारल्या मोठ्या चित्रपटांच्या ऑफर्स, टॉपच्या दिग्दर्शकांना दिला नकार (Shahrukh Khan’s Son Aryan Khan Turned Down Offers Of Many Big Films, Refused To Top Directors)

बॉलिवूड स्टार किड्स चित्रपटांमध्ये येण्यापूर्वीच प्रकाशझोतात येतात. त्यांच्या प्रत्येक शब्दावर, हालचालींवर प्रसारमाध्यमे बारकाईने लक्ष ठेवून असतात. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा सुद्धा प्रसिद्ध स्टार किड्सपैकी एक आहे, ज्याच्याबद्दल जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. आता आर्यनचे सुद्धा करीअर घडवण्याचे वय आहे. त्यामुळे तो आपल्या वडिलांप्रमाणे अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवतो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पण कदाचित अभिनय क्षेत्रात न येता काहीतरी वेगळं करायचं असे आर्यनने ठरवलेलं दिसतंय. याच कारणामुळे त्याने अनेक चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या.

आर्यन खान जसजसा मोठा होत आहे तसा तो आपले वडील शाहरुख खानसारखा दिसायला लागला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आर्यनने झोया अख्तर आणि करण जोहरच्या ऑफर नाकारल्या आहेत.

असे म्हटले जाते की, आर्यनने करण जोहर आपल्या कुटुंबाचा जवळचा मित्र असूनही त्याची ऑफर नाकारली. अलीकडेच करण जोहरने आर्यनला एक चांगली ऑफर दिली होती, पण आर्यनने ती करण्यास साफ नकार दिला होता. करण खूप दिवसांपासून आर्यनच्या होकाराची वाट पाहत होता, पण आर्यन आपल्या मतावर ठाम राहिला.

 करण जोहर व्यतिरिक्त झोया अख्तरनेही आर्यन खानला आपल्या आगामी ‘द आर्चीस’ चित्रपटाची ऑफर दिली होती, पण आर्यनने त्याची ऑफरही नाकारली होती. खरेतर आर्यनला अभिनेता नाही तर चित्रपट निर्माता बनायचे आहे.

 मीडिया रिपोर्टसनुसार, आर्यन खान लवकरच लेखक म्हणून पदार्पण करू शकतो. तो फीचर फिल्म्स आणि वेब शोसारख्या प्रोजेक्टवर काम करत आहे. अभिनयाच्या बाबतीत, शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवण्यास तयार आहे. अभिनेत्री म्हणून तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. लवकरच सुहाना खान झोया अख्तरच्या ‘द आर्चीस’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग सुरू झाले आहे.