हुबेहूब शाहरूख खान सारखा दिसणारा इब्राहिम कादरी...

हुबेहूब शाहरूख खान सारखा दिसणारा इब्राहिम कादरी, इंटरनेट गाजवतोय्‌…( Shahrukh Khan’s Lookalike Ibrahim Qadri Breaks the Internet with Viral Pics and Videos)

बॉलिवूड कलाकारांची नक्कल करणारे बरेच नकलाकार आहेत. परंतु काही जण थेट त्यांच्यासारखेच दिसतात. असाच एक शाहरूख खान सारखा दिसणारा कलाकार आहे. ज्याचे फोटो इंटरनेटवर खूपच धूम करीत आहेत. ते पाहिल्यावर कळेल की, हा तर हुबेहूब शाहरूख खान दिसतो…

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

शाहरूख खानचा चेहरा असलेल्या या तरुणाचे नाव आहे इब्राहिम कादरी, तो शाहरूख सारखी वेशभूषा करून. त्याच्याप्रमाणे स्टाईल मारत सोशल मिडियावर आपले फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. त्याच्या सोशल अकाऊंटमध्ये शाहरूख खानची फिल्मी गाणी भरपूर भरलेली आहेत.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

शाहरूख खानचे लूक्स असलेले, इब्राहिमचे व्हिडिओ अली गोनी या टी.व्ही. कलावंताने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केले आहेत. ते पाहून खुद्द अली गोनी पण अचंबित झाला आहे.फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

शाहरूखच्या काही नव्या व जुन्या लोकप्रिय गाण्यांवर इब्राहिमने अभिनय केला आहे. अन्‌ हे व्हिडिओ बरेच व्हायरल झाले आहेत. इब्राहिम हुबेहूब शाहरूख सारखा दिसतो. शाहरूखने त्याला पाहिले तर, आपण आरशासमोर उभे आहोत की काय, असे त्याला वाटेल.

फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम

शाहरूखच्या कामकाजाबद्दल बोलायचं तर तो ‘पठान’ या चित्रपटात दिसेल, याशिवाय अयान मुखर्जीचा ‘ब्रह्मास्त्र’ आणि आमिर खानचा ‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटांमधून तो कॅमिओ रोल करताना दिसणार आहे, अशा बातम्या आहेत.