शाहरुखला वकील जावई हवा….(Shahrukh Khan Wants A ...

शाहरुखला वकील जावई हवा….(Shahrukh Khan Wants A Lawyer To Be His Son-In-Law)

अभिनेता शाहरुख खान संपूर्ण सिनेइंडस्ट्रीत किंग खान म्हणून ओळखला जातो. त्याचे चाहतेही त्याला किंग खान म्हणून हाक मारतात. शाहरुखने बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे दिले त्यामुळे त्याची फॅन फॉलोविंग संपूर्ण जगभर पसरली आहे.

शाहरुख जसा त्याच्या प्रोफेशनल लाइफमुळे चर्चेत असतो त्याचप्रमाणे तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात देखील चर्चेत असतो. शाहरुखचे त्याच्या कुटुंबावर किती प्रेम आहे ते सर्वांनाच माहीत आहे. अनेकदा तो वेगवेगळ्या मुलाखतीत किंवा कार्यक्रमांमध्ये कुटुंबावरील प्रेम व्यक्त करताना दिसतो. आता पुन्हा एकदा शाहरुखने त्याच्या मुलीचा होणारा नवरा कसा असावा याबद्दल सांगितले आहे. सध्या सर्वत्र याच गोष्टीची जोरदार चर्चा सुरु आहे. शाहरुखला त्याचा जावई म्हणून एक वकील हवा आहे. तसेच त्याच्या मुलीशी लग्न करण्यासाठी त्याने एक अट सुद्धा ठेवली आहे.

बॉलीवूडचा किंग खान अशी ओळख असणाऱ्या शाहरुख खानची मुलगी सुहाना खान लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे . सुहाना खानचा द अर्चिवीस नावाचा  चित्रपट किंवा  वेब सीरिजही म्हणता येईल,  लवकरच येत आहे.  नुकतेच शाहरुख खानने दिलेल्या एका मुलाखतीत आपली मुलगी सुहाना खानचा बॉयफ्रेंड जो कोणी असेल किंवा ती ज्याच्याशी लग्न करेल तो वकील असावा अशी अट घातली आहे.  शाहरुख खानने म्हटले ज्याला माझा जावई किंवा सुहाना खानचा बॉयफ्रेंड व्हायचे असेल, त्याने आधी वकील व्हायला हवे. सध्या माध्यमांमध्ये त्याच्या या विधानाची जोरदार चर्चा सुरु आहे.

एका कार्यक्रमात शाहरुखला विचारण्यात आले होते की, सुहानाचा बॉयफ्रेंड किंवा पती कोणाला व्हायचे असेल तर त्याच्या अंगी कोणती पात्रता असणे आवश्यक आहे.  त्यावर उत्तर देताना शाहरुखने म्हटले की,  माझ्या मुलीच्या आयुष्यात येण्यापूर्वी त्याला आधी वकील म्हणून काम करावे लागेल.

यामागचे कारण सांगताना शाहरुख म्हणाला की, मला माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलेले सहन होणार नाही. आणि जर ते पाणी त्याच्यामुळे आले तर मी त्याला सोडणार नाही. मग समजा त्याने मला कोर्टात खेचले तर यासाठी तो स्वत: वकील असावा. शाहरुखच्या या वक्तव्यामुळे तो त्याच्या मुलीवर किती प्रेम करतो हे दिसून येते.