कित्येक मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करून शाहरुख खा...

कित्येक मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करून शाहरुख खान, बांधणार क्रिकेट स्टेडियम (Shahrukh Khan To Build A Cricket Stadium In America, With An Investment Of Million Dollars)

शाहरुख खानचे क्रिकेटवर बेहद्द प्रेम आहे. म्हणूनच त्याने आयपीएल सामन्यांसाठी आपली क्रिकेट टीम बनवली आहे. कोलकाता नाईट रायडर्स या संघाचा तो मालक आहे, हे सर्वज्ञात आहे. आता तो क्रिकेट साठी जागतिक दर्जाचे स्टेडियम उभारणार आहे. तेही अमेरिकेत, लॉस एंजल्स येथे. हे स्टेडियम 15 एकर जमिनीवर तयार होईल.

शाहरूखने ट्विटर वरून ही गोष्ट जाहीर केली आहे. एम एल क्रिकेट आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्या दरम्यान झालेल्या कराराची माहिती त्याने स्वतः दिली आहे. या कराराशी संबंधित एक अहवाल पण त्याने प्रसिद्ध केला आहे. या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, ‘कोलकाता नाइट रायडर्स आणि सिटी ऑफ इरविन यांच्या भागीदारीत एम एल क्रिकेट लीगने घोषणा केली की, ‘या करारामध्ये 15 एकर जमिनीवर जागतिक कीर्तीचे मैदान बांधण्यासाठी लिज व डिझाईनला मान्यता देण्यात आली आहे.’ त्यासाठी कित्येक मिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येईल.
आता शाहरुखच्या कामाबाबत बोलायचं तर त्याचे तीन मोठे चित्रपट येऊ घातलेत. पहिला आहे ‘पठाण’ दुसरा आहे एटली यांचा नवा चित्रपट. तर तिसरा चित्रपट राजकुमार हिरानी यांचा ‘डंकी’ आहे.