शाहरुखने माझे प्रेमजीवन बरबाद केले: स्वरा भास्क...

शाहरुखने माझे प्रेमजीवन बरबाद केले: स्वरा भास्करचा घणाघाती आरोप (Shahrukh Khan Ruined Swara Bhaskar’s Love Life, You Will Be Stunned To Know)

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री स्वरा भास्कर आपल्या बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे तिला कधी-कधी ट्रोलिंगलाही सामोरे जावे लागते. पण तरीही, ती लोकांसमोर आपल्या मनातील गोष्ट मांडण्यासाठी मागेपुढे पाहत नाही. सध्या स्वरा आपला आगामी चित्रपट ‘जहां चार यार’च्या प्रदर्शनासाठी सज्ज आहे. या चित्रपटात तिच्यासोबत मेहर विज, पूजा चोप्रा आणि शिखा तलसानिया दिसणार आहेत. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये पूर्णपणे व्यस्त आहे. अशाच एका प्रमोशनदरम्यान अभिनेत्रीने सांगितले की, तिचे प्रेमप्रकरण शाहरुखमुळे यशस्वी होऊ शकले नाही.

एका मुलाखतीत बोलताना स्वरा भास्करने सांगितले की, शाहरुख खान आणि आदित्य चोप्रा हे दोघे माझे लव्ह लाईफ उद्ध्वस्त करण्यासाठी जबाबदार आहेत. स्वराने सांगितले की, मी ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ हा चित्रपट अगदी लहान असताना पाहिला होता आणि तेव्हापासून मी माझ्या राजच्या शोधात आहे. पण मला आयुष्यात उशिरा कळले की माझा राज या जगात अस्तित्वात नाही.

मुलाखतीत बोलताना स्वरा म्हणाली की,मला नाती सांभाळता येत नाहीत. पण पुरुषांसोबत खूप चांगले जमते. मात्र आता माझ्यात त्यांच्याशी सामना करण्याची ताकद नाही. स्वरा 2018 मध्ये ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटात सोनम कपूर, करीना कपूर आणि शिखा तलसानियासोबत दिसली होती. आता पुन्हा ती ‘जहां चार यार’मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट देखील चार महिलांच्या मैत्री आणि बॉण्डिंगवर आधारित आहे.

काही दिवसांपूर्वी सामंथा रुथ प्रभूनेही निर्माता करण जोहरवर असाच आरोप केला होता. समंथा म्हणाली की, माझे वैवाहिक जीवन उध्वस्त होण्यास करणचे रोमॅण्टिक चित्रपट कारणीभूत आहेत.विशेष म्हणजे 2021 मध्ये सामंथाचा नागा चैतन्यसोबत घटस्फोट झाला होता.

फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम