तीन खानांमध्ये सर्वात श्रीमंत आहे शाहरुख खान, ज...

तीन खानांमध्ये सर्वात श्रीमंत आहे शाहरुख खान, जाणून घ्या त्याची संपत्ती (Shahrukh Khan is Richest Personality among Three Khans, You Will be Stunned to Know About his Net Worth)

बॉलिवूडमधील सर्वांचा लाडका किंग खान म्हणजेच शाहरुख खान आज आपला 57 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्याला सर्वजण वेगवेगळ्या प्रकारे शुभेच्छा देत आहेत.  शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही तुम्हाला त्याच्या कमाईबद्दल सांगणार आहोत. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये अनेक हुशार सेलिब्रेटी असले तरी इंडस्ट्रीत तिन्ही खान म्हणजेच शाहरुख खान, सलमान खान आणि आमिर खान यांच्याशी कोणीच तुलना करु शकत नाही. तिन्ही खान मंडळींनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. मात्र तिन्ही खानांच्या संपत्तीबद्दल बोलायचं झालं तर बॉलिवूडचा बादशाह म्हणजेच शाहरुख खान यात आघाडीवर आहे. शाहरुख खान हा तिन्ही खानांमध्ये सर्वात श्रीमंत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार किंग खान म्हणजेच शाहरुख खान सलमान खान आणि आमिर खानपेक्षा जास्त श्रीमंत आहे. शाहरुख खान बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी आहे. त्यांची एक दिवसाची कमाई जाणून कोणाच्याही पायाखालची जमीन सरकू शकते. असे म्हटले जाते की,  शाहरुख खान एका दिवसात सुमारे 1.4 कोटी रुपये कमावतो .

शाहरुख खानच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर त्याची एकूण संपत्ती ५ हजार ५९३ कोटी रुपये आहे. चित्रपटांव्यतिरिक्त तो जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करतो. किंग खान ‘रेड चिलीज एंटरटेनमेंट’चा मालक देखील आहे, या अंतर्गत त्याने अनेक चित्रपट निर्मिती केली आहे.  अभिनेता ‘कोलकाता नाइट रायडर्स’चा सह-मालक आहे, यामार्फतही तो भरपूर कमाई करतो. याशिवाय त्याच्याकडे मुंबई तसेच दुबईमध्ये अनेक आलिशान आणि महागड्या मालमत्ता आहेत.

बॉलिवूडचा बजरंगी भाईजान सलमान खान एका दिवसात सुमारे 1.01 कोटी रुपये कमावतो. सल्लू मियांची एकूण संपत्ती 60 मिलियन डॉलर म्हणजेच 2900 कोटी रुपये आहे. तर मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानबद्दल बोलायचे झाल्यास तो एका दिवसात सुमारे 33.47 लाख रुपये कमावतो आणि त्याची एकूण संपत्ती 225 मिलियन डॉलर म्हणजेच 1800 कोटी आहे.

शाहरुख खानचे चाहते गेल्या चार वर्षांपासून त्याच्या चित्रपटाची वाट पाहत आहेत. शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो लवकरच ‘पठाण’ चित्रपटात दीपिका पदुकोणसोबत दिसणार आहे. याशिवाय तो तापसी पन्नूसोबत ‘डंकी’ चित्रपटात आणि ‘टायगर 3’मध्ये पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे.