चाहत्याच्या विचित्र मागणीवर शाहरुख खानने दिलं म...

चाहत्याच्या विचित्र मागणीवर शाहरुख खानने दिलं मजेशीर उत्तर(Shahrukh Khan Gives A Funny Answer To A Fan’s Strange Request)

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान तब्बल 4 वर्षांनी पठाण चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. मात्र पठाण हा चित्रपट त्यातील बेशर्म रंग या गाण्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटाविषयी रोज कोणत्या ना कोणत्या चर्चा होत असतात. मात्र असे असूनही प्रेक्षकांमधील शाहरुखची क्रेझ मात्र कमी झालेली नाही. चाहते आजही त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुरलेले असतात.

शाहरुखचे चाहते हे केवळ भारतातच नाही तर भारताबाहेर जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले आहे. त्याचा बंगला मन्नत बाहेर तर रोज हजारो चाहत्यांची गर्दी जमा असते. सोशल मीडियावरही चाहते वेगवेगळ्या प्रकारच्या पोस्ट करुन त्यांचे शाहरुखप्रतिचे प्रेम व्यक्त करत असतात. अशाच एका चाहत्याने ट्विटरवरुन शाहरुखकडे एक विचित्र मागणी केली आहे.

एका चाहत्याने ट्वीट करत लिहिलं, “आम्हाला मुलगा किंवा मुलगी लवकरच होणार आहे त्याचं नाव तूच ठेव. प्लीज मला दोन्ही नावं सांग.” त्याचे हे ट्वीट शाहरुखने पाहिले. शाहरुखनेही या ट्वीटला उत्तर दिलं. तो म्हणाला, “आधी तुम्हाला बाळ होऊ दे मग त्याचे नाव ठरवू. पण तुझं आणि तुझ्या पत्नीचं अभिनंदन. तंदुरुस्त रहा.”  शाहरुखने दिलेलं हे उत्तर सर्वांनाच आवडलं आहे. त्याच्या या उत्तरावर त्याचे इतर चाहतेही प्रतिक्रिया देत आहेत.

शाहरुखच्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास त्याचा पठाण हा चित्रपट येत्या 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत दीपिका आणि जॉन अब्राहम यांच्या देखील मुख्य भूमिका असतील.