जगातल्या सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत कि...

जगातल्या सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत किंग खानने पटकावलं स्थान (Shahrukh Khan Fourth Richest Actor Of World; King Khan Net Worth)

कोणे एकेकाळी टीव्ही मालिकांमधून करिअरची सुरुवात केलेला शाहरूख खान बॉलिवूडवर (Bollywood) राज्य करेल असं कदाचित खूप कमी जणांना वाटलं असेल. ‘सर्कस’ या टीव्ही सिरियलमधून करियरची सुरूवात केल्यानंतर शाहरूख खानने फक्त हिरोच नाही पण व्हिलनच्या भूमिकाही चांगल्या प्रकारे साकारल्या.

बघता बघता शाहरूख खान हा बॉलिवूडचा किंग खान आणि रोमान्सचा बादशाह झाला. शाहरूख खानने अभिनयातून प्रसिद्धी आणि आदर मिळवलाच पण त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त त्यानं संपत्तीही कमावली आहे. आज अशी कोणतीच गोष्ट नाही जी किंग खानकडे नाही. शाहरुख खानची नेटवर्थ प्रचंड तगडी आहे.

शाहरुख जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक आहे. नुकताच आलेल्या एका रिपोर्टमध्ये शाहरुख जगातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी असल्याचे समजते. ८ जानेवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये शाहरुखचं नाव समोर आलं आहे. वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या ट्विटर अकाउंटवरुन ही यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्यामध्ये शाहरुख चौथ्या स्थानी आहे.

Richest actors in the world:

Jerry Seinfeld: $1 Billion Tyler Perry: $1 Billion Dwayne Johnson: $800 million Shah Rukh Khan: $770 million Tom Cruise: $620 million Jackie Chan: $520 million George Clooney: $500 million Robert De Niro: $500 million

— World of Statistics (stats_feed) January 8, 2023

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या रिपोर्टनुसार, शाहरुख खान याच्याकडे ७७० मिलियन डॉलर म्हणजे भारतीय रुपयानुसार ६६ हजार ३०० कोटी रुपयांची संपत्ती आहे. महत्त्वाचं म्हणजे, शाहरुख याच्यापेक्षा अधिक चाहत्यांची संख्या असणारा हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ पाचव्या स्थानावर आहे. टॉम क्रूझ याच्याकडे ५ हजार ९० कोटी रुपयांची संपत्ती आहे.

वर्ल्ड ऑफ स्टॅटिस्टिक्सने जगातील ८ श्रीमंत अभिनेत्यांची यादी जाहिर केली आहे. यादी जाहिर झाल्यानंतर शाहरुख पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शाहरुख आगामी सिनेमा ‘पठाण’ सिनेमामुळे चर्चेत आहेच. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अन्‌ २५ जानेवारी रोजी हा चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.