आर्यन खानला आज ‘बेल’ मिळणार का? शाहरूखने नेमलाय...

आर्यन खानला आज ‘बेल’ मिळणार का? शाहरूखने नेमलाय् सलमान खानचा वकील (Shahrukh Khan Appoints New Lawyer, Will Aryan Khan Get Bail Today?)

आर्यन खानला जामीन मिळावा, या अर्जावर आज मुंबईच्या कोर्टात सुनावणी व्हायची आहे. त्यासाठी आर्यनचे पिताजी शाहरूख खान यांनी एका नवीन वकीलाची नेमणूक केली आहे.

या नव्या वकीलांचे नाव आहे, अमित देसाई. हे सलमान खानचे वकील होते. हे वकीलसाहेब आर्यनला तुरुंगाच्या बाहेर आणू शकतील, अशी बोलवा आहे.

या संदर्भात असे कळते की, सलमान खान, आर्यनला अटक झालेल्या दिवसापासून त्याच्या बाजूने उभा आहे. त्यानेच शाहरूख खानला अमित देसाई या आपल्या वकीलांचे नाव सुचविले. आधी ज्यांनी आर्यनची बाजू कोर्टात मांडली, त्या मानेशिंदे वकीलांच्या कामगिरीवर शाहरूख खान फारसा संतुष्ट नव्हता, असे सांगितले जात आहे. कारण आर्यनला जामीन मिळवून देईन, असे सांगून देखील त्यांना जमले नव्हते.

हे अमित देसाई कोण आहेत?

ते क्रिमिनल लॉयर आहेत. त्यांनी सलमान खानची हिट ॲन्ड रन केस हाताळली होती. सलमानला ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर देसाई यांनी २००२ साली जामीन मिळवून दिला होता.

आज दुपारी पावणे तीन वाजता आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.