शाहरुख खान आणि चंकी पांडेचा दोस्ताना जुनाच̷...

शाहरुख खान आणि चंकी पांडेचा दोस्ताना जुनाच… स्ट्रगल काळात शाहरुख चंकीच्या घरी राहिला होता… (Shahrukh Khan And Chunky Panday Are Best Friends : Shahrukh Stayed In His House During Struggle Days)

आर्यन खान क्रुझ ड्रग्ज्‌ प्रकरणात तरुण अभिनेत्री अनन्या पांडेची एनसीबीने चौकशी केली. कारण आर्यनच्या मोबाईलमध्ये व्हॉटस्‌ अप्‌ चॅटमध्ये अनन्याचे नाव आढळले.

अनन्या आणि आर्यन हे बालपणीचे मित्र आहेत. कारण अनन्याचे बाबा चंकी पांडे आणि शाहरूख खान यांचा दोस्ताना खूप जुना आहे. जेव्हा शाहरूख, सिनेसृष्टीत नशीब उजळण्यासाठी मुंबईला आला होता, तेव्हा चंकीने त्याला खूप मदत केली होती.

या दोघांची दोस्ती ८० च्या दशकात सुरू झाली होती. शाहरूख मुंबईत नवा आला होता. अन्‌ चंकी पांडे तेव्हा स्टार बनला होता. तरीपण चंकीने त्याची खूप मदत केली. आपण स्ट्रगल काळात चंकीच्या घरीच राहिलो असल्याचे शाहरूखने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

चंकी, शाहरूखला आपल्या सोबत न्यायचा अन्‌ त्याची ओळख करून द्यायचा. चित्रसृष्टीतील कित्येक लोकांशी त्याने शाहरुखची ओळख करून दिली होती. चंकी पांडेने शाहरूखच्या करिअरमध्ये मोठी मदत केली. म्हणून ते दोघे अद्याप मित्र बनून राहिले.

चंकीच्या या सत्कृत्याबद्दल शाहरूख कृतकृत्य आहे. अन्‌ ‘चंकी हा माझा बेस्ट फ्रेंड आहे,’ असं तो बोलून दाखवतो. या मैत्रीचे रुपांतर त्यांच्या घरोब्यात झालं अन्‌ शाहरूखची मुले आर्यन-सुहाना व अनन्या यांचीही दोस्ती जमली. शाहरूखची बायको गौरी अन्‌ चंकीची बायको भावना पांडे यांच्यातही मैत्रीचे संबंध आहेत.