जामीनानंतर घरी आलेल्या आर्यनसाठी शाहरुख आणि गौर...

जामीनानंतर घरी आलेल्या आर्यनसाठी शाहरुख आणि गौरी बनविले नियम… (Shahrukh and Gauri Have Made These Rules for Their Son, Aryan Khan Will Have To Follow After Returning Home)

सध्या बॉलिवूडचा किंग शाहरुख खान आणि गौरी खानच्या घरी उत्सवाचं वातावरण आहे. कारण क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आर्यनला जामीन मिळून बऱ्याच दिवसानंतर लेक घरी आला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने मुंबईच्या एका क्रुझ शिपवर छापा घालून २ ऑक्टोबर २०२१ला आर्यन खानला अटक केली होती. आणि आज २८ ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयाने त्याला जामीन दिला असल्याने आज आर्यन घरी आला आहे. त्याच्या अटकेनंतर तणावात असलेल्या शाहरूख आणि गौरीलाही आता हायसे वाटले आहे. परंतु, आता त्यांना आर्यनची जास्त काळजी घ्यावी लागणार आहे आणि म्हणूनच त्यांनी आपल्या लेकासाठी काही नियम बनवले आहेत, जे आर्यनला पाळावे लागणार आहेत.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

ड्रग्ज प्रकरणामध्ये अडकलेल्या आर्यनला आता जामीन मिळाला असला तरी या प्रकरणातून त्याची पूर्णतः सुटका झालेली नाही. चौकशीसाठी त्याला कधीही बोलावले जाऊ शकते. त्यामुळेच आर्यनच्या सुरक्षेसाठी शाहरूख आणि गौरीने थोडं कठोर होण्याचं ठरवलं आहे.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

मीडियाच्या अहवालानुसार शाहरूख आणि गौरीने आपल्या मुलासाठी ३ कठोर नियम बनविले आहेत, जे आर्यनला पाळावेच लागणार आहेत. त्यांच्या कुटुंबातील निकटवर्तीयांनीच याबाबतची माहिती दिली आहे. पाहुया हे नियम काय आहेत?

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

शाहरुख आणि गौरी यांनी केलेला पहिला नियम म्हणजे आर्यनला मीडियापासून दूर ठेवण्यात येणार आहे. आर्यनला मागील काही आठवड्यात जे काही झाले त्याच्याशी संबंधित मीडिया कव्हरेजबद्दल किंवा गेल्या काही आठवड्यात त्याच्याबद्दल लिहिलेल्या कोणत्याही गोष्टीबद्दल सांगून त्याचे पालक त्याला आणखी त्रास देऊ इच्छित नाहीत.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

दुसऱ्या नियमाबद्दल बोलायचे झाले तर शाहरुख आणि गौरी आर्यनशी सोशल मीडिया किंवा फोनद्वारे संपर्क साधणाऱ्या मित्रांवर बारीक नजर ठेवतील. या प्रकरणापासून त्यांनी कानाला खडा लावला आहे की, आर्यनने त्याच्यासाठी समस्या निर्माण करू शकतील अशा लोकांसोबत राहू नये. असं त्याच्या आई-वडिलांना वाटतंय.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

शेवटच्या नियमाबद्दल बोलताना, शाहरुख आणि गौरीने ठरवले आहे की सध्या आर्यनला सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर ठेवले जाईल. असे केल्याने आर्यनला कोणत्याही प्रकारच्या प्रश्न किंवा निर्णयापासून दूर ठेवता येणार आहे. एक पालक म्हणून, परिस्थिती सामान्य होईपर्यंत आर्यनच्या सुरक्षिततेसाठी ही सर्व खबरदारी घेतली जाणार आहे.

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

फोटो सौजन्य: इंस्टाग्राम

आर्यनच्या तुरुंगात गेल्याने केवळ शाहरुख आणि गौरीच त्रासले नाहीत, तर त्याची बहीण सुहाना खानही खूप काळजीत होती. जोपर्यंत आर्यन तुरुंगात होता, तोपर्यंत सुहानाला तिच्या आई-वडिलांकडून भावाशी संबंधित अपडेट्स मिळत होते. आता आर्यन घरी परतल्याने मन्नतमध्ये उत्सवाचे वातावरण आहे आणि सुहानाही आपल्या भावाला भेटण्यासाठी मुंबईला येण्याच्या तयारीत आहे.