शहनाज गिल वजन कमी केल्यानंतर या गोष्टी खाणे टाळ...

शहनाज गिल वजन कमी केल्यानंतर या गोष्टी खाणे टाळते (Shahnaz Gill Does Not Eat These 3 Things After Losing Weight)

प्रसिद्ध अभिनेत्री आणि गायिका शहनाज गिलची फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आपल्या बदल करण्यासाठी तिने खूप मेहनतही घेतली आहे. आपल्या अवखळ वागण्यासाठी ती खूप प्रसिद्ध आहे.  बिग बॉसमध्ये आल्यानंतर तिने लोकांच्या मनात स्वत:साठी  एक खास स्थान निर्माण केले आहे. आता लवकरच शहनाज हिंदी चित्रपटांमध्येही दिसणार आहे.

प्रत्येक सेलिब्रेटींप्रमाणे शहनाज गिल देखील स्वतःला तंदुरुस्त आणि सुंदर ठेवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत करते.  जिममध्ये घाम गाळण्यासोबतच ती तिच्या खाण्यापिण्याकडेही खूप लक्ष देते. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर शहनाजचे वजन खूप कमी झाले आहे आणि वजन कमी झाल्यापासून तिने काही खाद्यपदार्थ पूर्णपणे वर्ज्य केले आहेत.

शहनाजने वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली.  तिच्या मेहनतीचे सलमान खानपासून अनेक सेलिब्रिटींनी कौतुक केले. केवळ 6 महिन्यांत शहनाज गिलने 12 किलो वजन कमी केले होते. अलीकडेच शहनाज गिल एका टीव्ही शोमध्ये दिसली, तिथे तिने वजन कमी केल्यावर ती कोणते खाद्यपदार्थ पूर्णपणे टाळते याची माहिती दिली.

शहनाजने सांगितले की वजन कमी केल्यापासून ती लोणी, तूप आणि आलू पराठे खाणे टाळत असल्याचे सांगितले. वजन कमी करताना तिने खूप कडक डाएट पाळले होते. त्याचा परिणाम सुद्धा चांगला झाला. आता पुढे तिला आपले वजन वाढवायचे नसल्यामुळे तिने स्वत:ला काही नियम घातले आहेत. या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

शहनाजच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच सलमान खानसोबत किसी का भाई किसी की जान या चित्रपटात दिसणार आहे.