शाहिद कपूरचा ४० वा वाढदिवस; भाऊ ईशानने भावूक मॅ...

शाहिद कपूरचा ४० वा वाढदिवस; भाऊ ईशानने भावूक मॅसेज करून केले विश (Shahid Kapoor’s 40th Birthday; Brother Ishaan Wishes By Emotional Message)

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आज २५ फेब्रुवारीला चाळीस वर्षांचा झाला. त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्याच्या लाडक्या भावाने ईशानने अतिशय भावूक असा मेसेज लिहिला आहे. ईशानने शाहिदसोबतचे आपले लहानपणीचे आणि आताचे फोटो कोलाज करून पोस्ट केले आहेत. ईशानने शाहिदसाठी पोस्टमध्ये गाणं लिहिलंय – ‘जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी तो हंसाए, कभी ये रुलाए। सच कहूं तो मैं हमेशा आपसे प्यार करूँगा, बड़े भाई। हैप्पी बर्थडे.’

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

पहिल्या जुन्या फोटोमध्ये शाहिद कपूरच्या मांडीवर ईशान खट्टर दिसत आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये ईशान आणि शाहिद सोबत बसलेले दिसत आहेत.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

ईशान खट्टरच्या या मॅसेजवर त्याचे चाहते आणि अनेक सेलिब्रिटीजनीही कमेंट केली आहे. सावत्र भाऊ असूनही ईशान आणि शाहिदचं एकमेकांवर सख्या भावांसारखं खूप प्रेम आहे. त्यांच्यातील हे प्रेम त्यांच्या फोटोंमधून पाहता येते. शाहिद कपूर पंकज कपूर आणि नीलिमा अजीम यांचा मुलगा आहे. परंतु शाहिदच्या जन्मानंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर नीलिमा अजीमने राजेश खट्टर यांच्याशी दुसरं लग्न केलं. शाहिदने एका शोमध्ये स्वतःच सांगितलं होतं की, त्याच्या सांगण्यावरूनच नीलिमाने दुसऱ्यांदा आई होण्याचा निर्णय घेतला होता. कारण शाहिदला भाऊ हवा होता. शाहिद आणि ईशानचे वडील वेगळे असले तरी त्यांच्यात अतिशय प्रेमळ नातं आहे. असं म्हणतात की, शाहिद आपल्या पासपोर्टवर शाहिद खट्टर असं नाव लिहितो.

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

फोटो सौजन्य : इंस्टाग्राम

फिल्म इंडस्ट्रीमध्ये शाहिद कपूरच्या अफेअरच्या बऱ्याच चर्चा झाल्या आहेत. परंतु शाहिदने लग्नाची बातमी देऊन सगळ्यांनाच अचबिंत केले होते. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींसोबत रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर शाहिदने साध्या आणि नॉन-फिल्मी कुटुंबातील मीरा राजपूतशी लग्न केले. दोघांच्या वयामध्ये बरंच अंतर असल्याने मीराला खरं तर हे लग्न मान्य नव्हतं. परंतु शाहिद आणि त्याच्या बहिणीने तिची समजूत घालून लग्न केलेच. शाहिद चांगला अभिनेता तर आहेच, तसाच तो चांगला पती, चांगला बाबा, चांगला मुलगा आणि चांगला भाऊसुद्धा आहे. शाहिदला दोन मुलं आहेत.
वयाची चाळीशी गाठलेल्या या अभिनेत्याला सोशल मीडियावर अनेक शुभेच्छा दिल्या जात आहेत. शाहिद आगामी ‘जर्सी’ चित्रपटामध्ये दिसेल. त्यानंतर ‘योद्धा’ हा चित्रपटही येणार आहे. अतिशय चार्मिंग अशा या अभिनेत्यास वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा!