शाहिद कपूरची आहे अलिशान जीवनशैली, कोटींच्या गाड...

शाहिद कपूरची आहे अलिशान जीवनशैली, कोटींच्या गाड्या,बंगला आणि बाइक्सचा आहे मालक (Shahid Kapoor Owns Luxurious House, Cars and Bikes, Know About Actor’s Lifestyle)

हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलाकार पंकज कपूर यांचा मुलगा शाहिद कपूरला आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हटले जाते. इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केल्यापासून त्याला खरी ओळख विवाह या चित्रपटातून मिळाली. त्यानंतर जब वी मेट या चित्रपटामुळे त्याला आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत स्थान मिळाले. शाहिद कपूर त्याच्या आलिशान जीवनशैलीसाठी देखील ओळखला जातो. सध्या अभिनेता आलिशान घर, कार आणि बाइक्सचा मालक आहे. 

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या शाहिद कपूरने इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. आज त्याची गणना इंडस्ट्रीतील श्रीमंत स्टार्समध्ये केली जाते. मिळालेल्या माहितीनुसार शाहिद कपूरची एकूण संपत्ती 300 कोटींच्या जवळपास आहे. चित्रपटांमधून भरपूर कमाई करणारा शाहिद कपूर ब्रँड एंडोर्समेंटच्या माध्यमातूनही चांगली कमाई करतो.

शाहिद कपूरच्या अलिशान जीवनशैलीबद्दल बोलायचे झाले तर मुंबईत त्याचे स्वतःचे डुप्लेक्स घर आहे. त्या घरात तो पत्नी मीरा राजपूत आणि मुलांसोबत राहतो. वरळीतील त्याच्या आलिशान घराची किंमत 56.6 कोटी रुपये आहे. याशिवाय त्यांचे मुंबईतील जुहू येथेही एक अपार्टमेंट आहे, त्याची किंमत 35 कोटी रुपये आहे.

आलिशान घरात राहणाऱ्या शाहिद कपूरला लक्झरी कार आणि बाइक्सचीही खूप आवड आहे. त्याच्या कार कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर त्याच्याकडे पोर्श कॅनी जीटीएस, जग्वार, मर्सिडीज बेंझ ए४०० आणि मर्सिडीज बेंझ जीएल क्लास सारख्या अनेक आलिशान कार आहेत.  शाहिदच्या बाईक कलेक्शनमध्ये 20 ते 23 लाख रुपयांच्या हार्ले डेव्हिडसन फॅट बॉय आणि सुमारे 11 लाख रुपयांच्या यामाहा एमटी01चा समावेश आहे.

शाहिद कपूरच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो आपल्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये खूप व्यस्त आहे. चाहत्यांमध्ये लोकप्रिय असलेल्या शाहिद कपूरचा सोशल मीडियावरही मोठा चाहतावर्ग आहे. इंस्टाग्रामवर अभिनेत्याचे 35.9 दशलक्ष फॉलोअर्स आहेत.