शाहिद कपूर करणार ओटीटीवर पदार्पण, टीझर शेअर करु...

शाहिद कपूर करणार ओटीटीवर पदार्पण, टीझर शेअर करुन दिली चाहत्यांना नववर्षाचे गिफ्ट(Shahid Kapoor Makes His Debut On OTT : Shares New Year Gift To Fans With Teaser)

पूर्वी आपल्या आवडत्या कलाकाराचा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर थिएटर अगदी तुडुंब भरलेली असायची. पण मध्यंतरीच्या लॉकडाऊनमध्ये सर्व थिएटर, मल्टिप्लेक्स बंद करण्यात आले होते. त्यामुळे सर्व चित्रपट हे ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात आले होते. या ओटीटीमुळे प्रेक्षकांना त्यांच्या सवडीनुसार कुठेही चित्रपट पाहता येऊ लागला. हळूहळू अनेक कलाकारांचा कल हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर येऊ लागला. आतापर्यंत  सैफ अली खानपासून, अभिषेक बच्चन ते पंकज त्रिपाठीपर्यंत कित्येक कलाकारांनी या ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करुन घेतला आहे.

आता या अभिनेता शाहिद कपूरसुद्धा या यादीत लवकरच सहभागी होणार आहे. ‘फॅमिली मॅन’सारखी जबरदस्त हीट वेबसीरिज देणारे दिग्दर्शक राज आणि डीके यांच्याबरोबर शाहिद ओटीटीविश्वात पदार्पण करणार आहे. ‘फर्जी’ या वेबसीरिजच्या माध्यमातून शाहिद लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच त्याने या चित्रपटातील फर्स्ट लूक इन्स्टाग्रामवर शेअर केला.

इन्स्टाग्रामवर टीझर शेअर करत शाहिदने कॅप्शनमध्ये लिहिले की, “हे माझ्या आयुष्यातील एक नवं पर्व आहे, लोकांना हे आवडेल का? अखेर कलाकार हा नेहमीच कलाकार असतो नाही का?”

ही वेबसिरीज एका कलाकाराच्या आयुष्याभोवती फिरते. त्यात शाहिद चित्रकार दाखवला आहे. या वेबसीरिजमध्ये झाकीर खान, केके मेनन, अमोल पालेकर, राशी खन्ना कुब्रा सैत हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

या वेबसिरीजबाबत शाहिदने एका मुलाखतीत सांगितले की, “ओटीटीवर पदार्पण करणं हे माझ्यासाठी एखादा ट्रेंड मोडण्यासारखं आहे. मला स्वतःला आव्हान द्यायला आवडतं. गेली २० वर्षं मी हेच करत आलो आहे. एखाद्या वेबसीरिजच्या ८ भागात एखादं पात्र कशापद्धतीने खुलवलं जातं हे जाणून घेण्यासाठी मी प्रचंड उत्सुक आहे. चित्रपटातील २ तासांच्या भूमिकेपेक्षा हे प्रचंड वेगळं आणि आव्हानात्मक आहे, मला यात काम करायला प्रचंड मजा आली.”