शाहिद कपूर विवाह चित्रपटाच्या एका सीनवेळी पगडी ...

शाहिद कपूर विवाह चित्रपटाच्या एका सीनवेळी पगडी घालायला तयार नव्हता, 16 वर्षांनी दिग्दर्शकांनी केला खुलासा (Shahid Kapoor Did Not Want To Wear A Turban In The Wedding Scene Of The Film ‘Vivah’, The Director Revealed After 16 Years)

सुप्रसिद्ध दिग्दर्शक सूरज बडजात्या यांनी 2006 मध्ये विवाह चित्रपट बनवला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटातील शाहिद कपूर आणि अमृता राव या जोडीच्या अप्रतिम अभिनयाने सर्वांची मने जिंकली. चित्रपटाची कथाही सर्वांच्या मनाला भिडली. आता या चित्रपटाला 16 वर्षे पूर्ण झाली आहेत. 16 वर्षांनी चित्रपटाच्या दिग्दर्शकाने शाहिद कपूरबद्दल काही खुलासे केले आहेत.

चित्रपटाबद्दल बोलताना सूरज बडजात्या यांनी सांगितले की, शाहिद कपूर चित्रपटातील लग्नाच्या एका सीनमध्ये पगडी घालण्यास तयार होत नव्हता. पगडी घालण्यावर त्याने खूप आक्षेप घेतला. यामुळे तो खूप नाराजही झाला होता.

याशिवाय सूरज बडजात्या यांनी आणखी एक खुलासा केला की, चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान शाहिद कपूरने अनेकवेळा कपड्यांवर आक्षेप घेतला होता. शिवाय आम्ही शाहिदला अरेंज्ड मॅरेजबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे खूप चिडवायचो. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान जेव्हा शाहिदला अमृताला त्याच्या घरी भेटायला जायचे होते, तेव्हाही शाहिदने आपल्या मनमानीनुसार कोट आणि जीन्स घातली होती.

सूरज यांनी सांगितले की, ‘विवाह’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान लग्नाचा सीन शूट होत असताना शाहिदला डोक्यावर पगडी बांधावी लागेल असे सांगितल्यावर तो खूप अस्वस्थ झाला. पण जेव्हा शाहिदने मीरा राजपूतशी खऱ्या आयुष्यात लग्न केले तेव्हा त्याने कोणतीही तक्रार न करता सर्व विधी पार पाडले आणि सर्व प्रकारचे पोशाख परिधान केले होते.

‘विवाह’ चित्रपटाच्या स्टार कास्टबद्दल बोलायचे झाले तर शाहिद कपूर आणि अमृता राव व्यतिरिक्त अनुपम खेर, आलोक नाथ, समीर सोनी आणि सीमा बिस्वास यांनीही या चित्रपटात जबरदस्त काम केले आहे. या चित्रपटातील गाणी आजही लोकांच्या स्मरणात आहेत.