शाहिन भट्टने शेअर केला आलिया भट्टसोबतचा फोटो, आ...

शाहिन भट्टने शेअर केला आलिया भट्टसोबतचा फोटो, आलियाच्या चेहऱ्यावर दिसले आई झाल्यानंतरचे तेज(Shaheen Bhatt shares happy photo of New Mom Alia Bhatt, New mommy Alia is brimming with happiness)

आलिया भट्ट सध्या आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम काळ एन्जॉय करत आहे. एप्रिलमध्ये रणबीर कपूरसोबत लग्न केल्यानंतर, ती 6 नोव्हेंबरला आई झाली. आलियाने एका मुलीला जन्म दिला. चाहते तिच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी खूप उत्सुक झाले आहेत.

आई झाल्यानंतर आलिया भट्टचा कोणताही फोटो समोर आला नव्हता, मात्र आता तिचा एक सुंदर फोटो समोर आला आहे. आलियाची बहीण शाहीन भट्टने हा फोटो शेअर केला आहे. नुकत्याच आई झालेल्या आलियाची झलक पाहून चाहते खुश झाले आहेत.

शाहीनने इन्स्टाग्रामवर आलियासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. मुलीच्या जन्मानंतर दोन आठवड्यांनी आलियाचा फोटो पाहायला मिळाला आहे. फोटोत आलियाच्या चेहऱ्यावर गोड हास्य आणि आईपणाचे तेज स्पष्टपणे दिसत आहे. तर आलियाची बहीण शाहीन भट्ट देखील मावशी झाल्यामुळे खूप आनंदी आहे. फोटोत मावशी झाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे.

आलियाने पिवळ्या रंगाचा टाय-डाय टी-शर्ट घातला आहे, तर शाहीनने केशरी जॅकेट घातले आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये शाहीनने हार्ट आणि ड्रम इमोजी शेअर केला आहे. चाहत्यांना हा फोटो खूप आवडला असून युजर्स कमेंटमध्ये आई आणि मावशीच्या जोडीचे कौतुक करत आहेत.

काही दिवसांपूर्वी आलिया भट्टने मुलीला जन्म दिल्यानंतर आपला पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोमध्ये आलिया ‘मम्मा’ लिहिलेला कप दाखवताना दिसत आहे. हा फोटो शेअर करत आलियाने कॅप्शनमध्ये ‘ही मी आहे.’ असे लिहिले.

आलिया आणि रणबीरच्या राजकुमारीचे नाव जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. तसेच तिची पहिली झलक पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. असे म्हटले जाते की दोघांनी आपल्या राजकुमारीचे नाव तिचे आजोबा दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्या नावाशी निगडीत असे निश्चित केले आहे.