शाहरुखचा छोटा लेक अबराम आहे गणेश भक्त, घरात बाप...

शाहरुखचा छोटा लेक अबराम आहे गणेश भक्त, घरात बाप्पाची स्थापना केल्यावर त्याने घेतले लालबागच्या राजाचे दर्शन (Shah Rukh Khan’s Son AbRam is a Ganesh Devotee, Visits Lalbaugcha Raja to seek blessings)

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आणि गौरी खानचा छोटा लेक अबरामला सण साजरे करायला खूप आवडतात. तो प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. अबरामसुद्धा त्याच्या वडीलांप्रमाणेच कट्टर गणेशभक्त आहे. त्यामुळेच आपल्या घरी गणपती बाप्पाचे स्वागत केल्यानंतर अबराम लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेला होता. अबरामचा लालबाग येथील व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

 31 ऑगस्टला गणेश चतुर्थीच्या दिवशी शाहरुखने घरी गणपती बाप्पाचे स्वागत केले होते. किंग खानने सोशल मीडियावर आपल्या घरी बसवलेल्या गणपतीचा फोटो शेअर करून त्याबद्दल माहिती दिली होती. त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये शाहरुखने लिहिले की, मी आणि माझा लहान मुलगा अबरामने आमच्या घरी गणपतीचे स्वागत केले आणि त्यानंतर आम्ही खूप चविष्ट मोदक खाल्ले.  कठोर परिश्रम, चिकाटी आणि देवावर विश्वास ठेवून तुम्ही तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरवू शकता असे आपल्याला शिकवले जाते. सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.”

घरी गणेशोत्सव साजरा केल्यानंतर आता किंग खानचा छोटा लेक राजाच्या दर्शनासाठी लालबागला गेला. पापाराझी वीरेंद्र चावला यांनी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या अबरामचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अबरामला लालबागच्या राजाच्या दरबारात सुरक्षा रक्षकांनी घेरलेले पाहायला मिळते. यावेळी अबरामसोबत गौरी किंवा शाहरुख नव्हते. मात्र किंग खानने कडक सुरक्षा व्यवस्थेत अबरामला लालबागच्या दर्शनासाठी एकट्याला पाठवले होते. व्हिडिओमध्ये अबराम पांढऱ्या टी-शर्ट आणि ग्रे शॉर्ट्समध्ये पाहायला मिळतो.

अबरामला सर्व सण साजरे करायला आवडतात. जन्माष्टमीच्या दिवशीही अबराम घरीच दहीहंडी साजरी करताना दिसला होता. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये अबराम शाहरुख खानच्या खांद्यावर बसून हंडी फोडताना दिसत होता. आणि आता तो त्याच उत्साहात गणेश चतुर्थी साजरी करताना दिसत आहे.

शाहरुखच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तो  ‘पठाण’ या चित्रपटाद्वारे पुनरागमन करत आहे, या चित्रपटात त्याच्यासोबत जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होईल. याशिवाय तो ‘ब्रह्मास्त्र’मध्येही पाहुणा कलाकार म्हणून दिसेल. तसेच त्याने डंकी या चित्रपटाचे शूटिंगही सुरू केले आहे.