डंकीच्या सेटवरून लीक झाला शाहरुखचा फोटो, कॅज्यु...

डंकीच्या सेटवरून लीक झाला शाहरुखचा फोटो, कॅज्युअल ड्रेसिंगमध्ये दिसतोय अभिनेता (Shah Rukh Khan’s Photo From ‘Dunki’ Sets Leaked Online)

बॉलीवूडचा सुपरस्टार शाहरुख खानने लंडनमध्ये त्याच्या आगामी ‘डंकी’ या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली आहे. दिग्दर्शक राजकुमार हिरानी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. राजकुमार हिरानी दिग्दर्शित  ‘डंकी’ या चित्रपटाच्या सेटवरून शाहरुख खानचा एक फोटो लीक झाला आहे. लीक झालेला हा फोटो काही मिनिटांतच व्हायरल होऊ लागला आहे.

अभिनेता शाहरुख खान सध्या लंडनमध्ये त्याचा आगामी चित्रपट डंकीचे शूटिंग करत आहे. शूटिंगदरम्यानच अभिनेत्याचे सेटवरून काढलेला फोटो लीक झाला होता आता हा लीक झालेला फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये शाहरुख खानचा अनोखा अंदाज पाहायला मिळत आहे.

लीक झालेला फोटो फॅनपेजवर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये शाहरुख अतिशय साध्या कपड्यांमध्ये दिसत आहे. शाहरुखने साधा चेकचा शर्ट आणि काळी पँट घातली असून हातात कडे घातले आहे. फोटोत त्याची बारीक दाढी वाढलेली दिसते तसेच त्याचे केस विखुरलेले आहेत. या हेअरस्टाईलमधील त्याचा लूक खूपच मस्त दिसत आहे. अभिनेत्याचा हा फोटो लंडनमधील आहे. चित्रपटाच्या सेटवरून लीक झालेल्या या फोटोमध्ये किंग खानसोबत चित्रपटाचे इतर क्रू मेंबर्सही दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी या चित्रपटाच्या नावाची घोषणा करण्यात आली. तसेच एक व्हिडिओ शेअर करुन चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा कऱण्यात आली.

या व्हिडिओमध्ये दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि अभिनेता शाहरुख खान एकत्र दिसत आहेत. या चित्रपटात किंग खानसोबत तापसी पन्नू देखील दिसणार आहे. शाहरुख खान आणि तापसी पन्नू यांचा डंकी हा चित्रपट 22 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.