अमिताभ बच्चनचा नातू अगस्त्य करतोय शाहरुख खानची...

अमिताभ बच्चनचा नातू अगस्त्य करतोय शाहरुख खानची लेक सुहाना खानला डेट (Shah Rukh Khan’s Daughter Suhana Khan Is Dating Amitabh Bachchan’s Grandson Agastya Nanda, His Mother Has Already Approved This Relationship)

बॉलिवूडमध्ये कधी कोणाची कशी जोडी जमेल सांगता येत नाही. आता आणखी एक नवीन जोडपे बी-टाऊनमध्ये दाखल झाले आहे. हे नवीन जोडपे बॉलिवूडच्या दोन मोठ्या कुटुंबांचे स्टार किड्स आहेत. हे जोडपे म्हणजे शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा. मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही कुटुंबांकडून त्यांच्या नात्याला परवानगी मिळाली आहे.

‘द आर्चीज’ चित्रपटाच्या सेटवरील एका सूत्राने खुलासा केला आहे की सुहाना आणि अगस्त्य हे आधीच कपल आहेत. त्यांनी कधीच त्यांचे नाते लपवले नाही. यावर्षी अगस्त्यने सुहानाला ख्रिसमस पार्टीसाठी आमंत्रित केले होते, तेव्हा अगस्त्यने सुहानाची ओळख आपल्या कुटुंबाला जोडीदार म्हणून ओळख करून दिली होती. अगस्त्य नंदाची आई श्वेता बच्चनला देखील सुहाना खूप आवडते आणि त्यांनी त्यांच्या नात्याला मान्यता दिली आहे, असेही सूत्रांकडून समजले आहे.

सुहाना खान आणि अगस्त्य नंदा झोया अख्तरच्या ‘द आर्चीज’ चित्रपटातून पदार्पण करत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहाना आणि अगस्त्य यांच्यातील प्रेमाची सुरुवात याच चित्रपटापासून झाली. सेटवरून मिळालेल्या माहितीनुसार, सुहाना आणि अगस्त्य सेटवर बराच वेळ एकत्र घालवत असत आणि दोघांमध्ये खूप जवळचे बॉन्डिंग होते. सेटवर त्यांनी कधीही कोणापासून आपले बॉन्डिंग लपवले नाही.

दोघांनी अद्याप आपले नाते अधिकृत केले नाही, परंतु चित्रपटाशी संबंधित बहुतेक लोकांना ऑगस्ट 2020 मध्येच त्यांच्या नात्याबद्दल माहिती मिळाली होती. सुहाना खान आणि अगस्त्य नंदा दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अनेकदा एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करतात.