शाहरुख खानने ठेवली आहे फिमेल बॉडीगार्ड, कारण वा...

शाहरुख खानने ठेवली आहे फिमेल बॉडीगार्ड, कारण वाचून वाढेल अभिनेत्यासाठी अभिमान (Shah Rukh Khan Has Hired Female Bodyguards, The Reason Will Win Your Hearts)

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचे देशातच नव्हे तर जगभरात चाहते आहेत. आपल्या अभिनयाने किंग खानने जगाच्या कानाकोपऱ्यातील चाहत्यांची मने जिंकली आहेत. किंग खानची फॅन फॉलोइंग जेवढी मोठी आहे, तेवढेच त्याचे मनही मोठे आहे. कलाकार आपल्या चाहत्यांसाठी काहीही करू शकतात. कदाचित त्यामुळेच तो त्याच्या चाहत्यांसाठी बॉलिवूडचा बादशाह आहे.

किंग खानच्या सिक्योरिटी टीम मध्ये महिला अंगरक्षकही आहेत. शाहरुखची क्रेझ मुलांपेक्षा मुलींमध्ये जास्त आहे. इतकंच नाही तर स्त्रिया अभिनेत्यासाठी एवढ्या वेड्या आहेत की जेव्हाही त्या शाहरुखला सार्वजनिक ठिकाणी पाहतात तेव्हा त्यांना अभिनेत्याला स्पर्श करून मिठी मारावीशी वाटते. महिला चाहत्यांची ही क्रेझ हाताळण्यासाठी किंग खानने महिला अंगरक्षकांची नेमणूक केली आहे.

किंग खान आपल्या चाहत्यांशी सौम्य वागण्यासाठी ओळखला जातो. विशेषतः तो स्त्रियांचा खूप आदर करतो. आपल्या महिला चाहत्यांशी कठोरपणे वागलेले त्याला आवडत नाही, म्हणून त्याने महिला अंगरक्षकांची नियुक्ती केली आहे. खुद्द अभिनेत्याने एका इव्हेंटमध्ये खुलासा केला की महिलांना धक्काबुक्की करणारे त्याचे पुरुष अंगरक्षक त्याला आवडत नाहीत. तो म्हणाला, अशा अनेक महिला आहेत ज्यांना मी आवडतो, त्या मला स्पर्श करू इच्छितात. अशा परिस्थितीत माझ्या सुरक्षेसाठी माझे अंगरक्षक महिलांसोबत अनेकदा धक्काबुक्की करत असत आणि पुरुष अंगरक्षकाने महिलेला हात लावलेला मला सहन होत नव्हते, म्हणून मी महिला अंगरक्षकांना नियुक्त केले, जेणेकरून माझ्या महिला चाहत्यांशी असभ्य वर्तन होऊ नये.”

किंग खानच्या चाहत्यांबद्दलच्या सौम्य वृत्तीने पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकली आहेत आणि किंग खानने पुन्हा एकदा तो खरोखरच बॉलिवूडचा बादशाह असल्याचे सिद्ध केले आहे.

शाहरुखने अलीकडेच ‘पठाण’ या अॅक्शन चित्रपटाद्वारे चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. हा चित्रपट प्रचंड हिट ठरला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाचे अनेक विक्रम मोडले आहेत.