विमानतळावर एका व्यक्तीने शाहरुखचा हात पकण्याचा ...

विमानतळावर एका व्यक्तीने शाहरुखचा हात पकण्याचा केला प्रयत्न, भडकलेल्या शाहरुखला आर्यन खानने असे केले शांत (Shah Rukh Khan Gets Angry After A Fan Tries To Grab His Hand, Aryan Khan Cools Him Down, Netizens Say- Son Is Protective)

विमानतळावर कलाकारांची ये जा चालूच असते. त्यामुळे अनेकादा आपल्या आवडत्या कलाकाराला पाहण्यासाठी, त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी चाहत्यांची तिथे गर्दी होत असते. अभिनेता शाहरुख खान आपली दोन्ही मुलं अबराम आणि आर्यन खानसोबत मुंबई विमानतळावरुन बाहेर पडत असताना त्याच्यासोबत असे काही झाले की त्याचा पारा चढला.

विमानतळावरुन बाहेर पडत असताना शाहरुखच्या एका चाहत्याला त्याच्यासोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही आणि त्याचवेळी जबरदस्ती सेल्फी काढण्याचा नादात त्याने शाहरुखचा हात पकडला. अज्ञात व्यक्तीने हात पकडल्यामुळे शाहरुखला राग आला व त्याने त्याचा हात झटकला. शाहरुख रागात त्याच्यावर बरसणार इतक्यात आर्यन खानने या प्रकरणात हस्तक्षेप करुन दोघांना वेगळे केले आणि आपल्या वडीलांना शांत केले. ही घटना रविवारी रात्री घडली.

त्यावेळी शाहरुखने तोंडाला मास्क लावले होते. तसेच त्याने पांढरा टीशर्ट, जीन्स आणि काळ्या रंगाचे जॅकेट घातले होते. तर अबरामने लाल रंगाचे टीशर्ट आणि आर्यनने निळ्या रंगाचे टीशर्ट घातले होते. विमानतळावरील तो व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडिओतील आर्यनच्या समजूतदारपणाचे सर्वजण कौतुक करत आहेत. आर्यन ज्या प्रकारे आपल्या वडीलांचे रक्षण करतो ते पाहून अनेकांना त्याचा अभिमान वाटत आहे. तर काहीजण आर्यनला पाहून याने लवकरच बॉलिवूडमध्ये यावे अशी इच्छा व्यक्त केली आहे. काहींना व्हिडिओतील छोटा अबराम खूप आवडला आहे. त्याच्या निरागसतेचेही अनेकांनी कौतुक केले आहे.

अनेक यूजर्सनी सेल्फी काढणाऱ्या त्या अज्ञात व्यक्तीविषयी राग व्यक्त केला असून कमेंटमध्ये, एखाद्याच्या परवानगीशिवाय कसं काय कोणी स्पर्श करु शकतं असे म्हटले आहे, तर आणखी एकाने लोकांना पर्सनल स्पेसचा अर्थ कधी समजेल असे विचारले आहे. एका यूजरने म्हटले की, त्यांना जगू द्या. तुम्ही त्यांच्यावर अशा प्रकारची जबरदस्ती करता आणि जेव्हा ते त्यावर प्रतिक्रिया देतात तेव्हा तो तुम्हाला अपमान वाटतो.

लोकांनी स्वतःवर आणि आपल्या वागण्यावर नियंत्रण ठेवावे असे चाहते म्हणत आहेत. तुम्हाला सेल्फी काढायची असेल तर त्यांना विनंती करा, सरळ जाऊन असे हात धरू नका. असे केल्यास अर्थात कोणालाही राग येईल.