कायद्याच्या कचाट्यात पुन्हा सापडला कपिल शर्मा&#...

कायद्याच्या कचाट्यात पुन्हा सापडला कपिल शर्मा… प्रमोटरने लावला गंभीर आरोप (Serious Allegations Against Kapil Sharma May Land Him In Trouble)

हिंदी इंडस्ट्रीमधला सगळ्यात प्रसिद्ध विनोदीवीर म्हणून कपिल शर्माला ओळखले जाते. कपिल गेली कित्येक वर्षे त्याच्या विनोदाने लोकांचे मनोरंजन करत आहे. त्याच्या द कपिल शर्मा शो आणि ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’ या दोन्ही शो ला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली. सध्या कपिल त्याच्या टीमसोबत यूएस आणि कॅनडा दौऱ्यावर आहे. पण अशातच त्याच्यावर एक गंभीर आरोप लागल्याची बातमी समोर आली आहे.

कपिल त्याच्या टीमसोबत कॅनडामध्ये लाइव्ह शो करुन त्याच्या तिथल्या चाहत्यांचे मनोरंजन करत आहे. त्याच्यासोबत त्या दौऱ्यात कृष्णा अभिषेक , कीकू शारदा , चंदन प्रभाकर, सुमोना चक्रवर्ती  आणि राजीव ठाकुर हे कलाकार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेच्या एका प्रसिद्ध प्रमोटरने कपिलवर कराराच्या उल्लंघनाचा आरोप लावला आहे.

प्रमोटरच्या म्हणण्यानुसार कपिलने ६ शहरात कार्यक्रम करण्याचा करार केला होता. पण त्यातल्या एका कार्यक्रमात तो पोहचला नाही. तसेच कपिलने एका कार्यक्रमाला न पोहचल्यास त्याची नुकसान भरपाई देण्याचे वचन दिले होते. पण त्याने तो कार्यक्रम केला नाहीच शिवाय त्यांचा फोनसुद्धा उचलला नाही. त्यामुळे आता त्याच्या विरोधात कायद्यानेच पाऊल टाकणार असल्याचे प्रमोटरने सांगितले. सध्या ही केस न्यूयॉर्कच्या एका कोर्टात चालू आहे.

कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची कपिलची ही पहिलीच वेळ नाही. सध्या कपिल आणि त्याची टीम कॅनडाला आहे. जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात ते न्यूयॉर्कला जाणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे तो तिथे गेल्यावर काय होईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.