टी.व्ही. मालिकेतील पात्रांना प्रि-वेडींग शूटचा ...

टी.व्ही. मालिकेतील पात्रांना प्रि-वेडींग शूटचा संसर्ग : जुन्या जमान्यातील नट-नट्यांच्या लूकला पसंती (Serial Characters Prefer Retro-Look For Pre-Wedding Shoot In Lead Character’s Wedding)

स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील जयदीप-गौरी या पात्रांच्या लग्नाचा थाटमाट लवकरच पाहायला मिळणार आहे. माई-दादांच्या इच्छेखातर हा लग्नाचा घाट घातला जात आहे.

या लग्न समारंभामध्ये मेंदी, हळद, वरात असे सोहळे साग्रसंगीत होणार आहेत. विशेष म्हणजे लग्नापूर्वीचे फोटो सेशन करण्यासाठी सर्व पात्रे उत्सुक असल्याचे दाखविण्यात आले आहे. अन्‌ त्यासाठी संपूर्ण शिर्के कुटुंबाने रेट्रो लूकला पसंती दिली आहे.

त्यानुसार जयदीप-गौरी हे मुख्य दांपत्य डॉ. काशिनाथ घाणेकर- आशा काळे यांचं रूप घेतील. तर उदय-देवकी हे जोडपं चक्क दादा कोंडके – उषा चव्हाण यांच्या रूपात दिसणार आहेत.

शेखर-रेणुका या जोडप्याने अशोक सराफ – रंजना या कलाकारांचे लूक निवडले आहे. अन्‌ मल्हार लक्ष्मीकांत बेर्डे यांचे लूक घेत आहे.

अशा रीतीने मराठी चित्रपटातील लोकप्रिय कलाकारांचे लूक घेऊन मालिकेतील प्रि-वेडींग शूट रंगतदार होईल, अशी आशा आहे.