तब्बल २४ वर्षांनंतर सोहेल आणि सीमा खान होताहेत ...

तब्बल २४ वर्षांनंतर सोहेल आणि सीमा खान होताहेत विभक्त … (Separation: Shocking! Sohail Khan And Seema Khan File For Divorce After 24 Years Of Marriage)

सलमान खानचा भाऊ अरबाज आणि मलायका यांचा आधीच घटस्फोट झाला आहे आणि आता सलमानचा लहान भाऊ सोहेल (Sohail Khan) आणि त्याची पत्नी सीमा खान (Seema Khan) यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. त्यासाठी शुक्रवारी ते फॅमिली कोर्टाबाहेर दिसण्यात आले.

सोहेल आणि सीमा यांचे १९९८ साली लग्न झाले असून त्यांना दोन मुलगे आहेत. काही वर्षांपासून दोघं वेगवेगळे राहत असल्याच्या बातम्या यापूर्वीही ऐकण्यात आल्या होत्या. आता विश्वसनीय सुत्रांकडून असं सांगितलं जात आहे की, सोहेल आणि सीमा, दोघं त्यांच्या घटस्फोटाच्या अर्जासाठी फॅमिली कोर्टात गेले होते. दोघांचे फॅमिली कोर्टाबाहेरचे फोटो व्हायरल होत आहेत. परंतु त्यांच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांना वाईट वाटत आहे.

सोहेल आणि सीमाने घटस्फोटाचं कारण जरी स्पष्ट केलेलं नसलं तरी २४ वर्षांचा संसार मोडण्यामागे प्रेमप्रकरणासारखं काहीतरी कारण असणार, असा अंदाज लावला जात आहे. कारण काहीही असो चाहत्यांना त्यांच्याबद्दल कितीही वाईट वाटले तरी तो त्यांचा घरचा प्रश्न आहे. आपण त्यांच्या निर्णयाचा सन्मान केला पाहिजे.