ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन( S...

ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी यांचे निधन( Senior Actor Bhalchandra Kulkarni Passes Away)

मराठी सिनेसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते  भालचंद्र कुलकर्णी यांचे आज अल्पशा आजराने निधन झाले आहे. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भालचंद्र कुलकर्णी यांच्या निधनानाने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांसोबत विविध ढंगाच्या विविध धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत.

झुंज तुझी माझी’, ‘हळद रुसली कुंकू हसले’, ‘जावयाची जात’, नवरा नको गं बाई, पिंजरा, मुंबईचा जावई , सोंगाड्या, थरथराट, खतरनाक अशा ३०० पेक्षा जास्त चित्रपटांत त्यांनी काम केले आहे.

त्यांच्या कारकिर्दीत १९८४ साली आलेल्या ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ या चित्रपटातील ‘चांगभलं रं चांगभलं, देवा ज्योतिबा चांगभलं’ हे त्यांच्यावर चित्रित झालेले गाणं प्रचंड गाजलं. आजही या गाण्याच्या तालावर लोक थिरकतात.

अभिनेते भालचंद्र कुलकर्णी हे अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे संचालकदेखील होते. आतापर्यंत कुलकर्णी यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. चित्रपट महामंडळाने त्यांना ‘चित्रभूषण पुरस्कार’ देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला होता.