साराचे आपल्या सावत्र आई करीना कपूरसोबतचे बॉण्डि...

साराचे आपल्या सावत्र आई करीना कपूरसोबतचे बॉण्डिंग पाहून अमृता सिंगची अशी झाली होती हालत (Seeing Bonding of Daughter Sara With Step Mother Kareena Kapoor, Amrita Singh Reacted Like This)

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खानचे आपली सावत्र आई करीना कपूर खानसोबत खूप चांगले बॉण्डिंग आहे. अनेकदा दोघी एकत्र दिसतात. सैफ अली खानने पहिली पत्नी अमृता सिंगसोबत घटस्फोट घेतल्यानंतर 2012 मध्ये करीना कपूरसोबत लग्न केले.

त्यावेळी असे म्हटले जात होते की अमृता आपल्या मुलांच्या करीनासोबतच्या नात्याबाबत खुश नाही. सावत्र आई करीना कपूरसोबतचे बॉन्डिंग पाहून अमृता सिंगच्या स्थितीचा खुलासा स्वत: सारानेच एका मुलाखतीत केला होता.

आपली मुलगी सारा अली खान आणि करीना कपूर यांच्या बॉण्डिंगबाबत अमृता सिंग खूश नसल्याचे जेव्हा म्हटले जात होते त्याचवेळी अभिनेत्रीने ही बातमी निव्वळ अफवा असून त्यात काहीही तथ्य नसल्याचे सांगितले.

सारा बरेचदा आपल्या आईसोबत असताना चुडीदार किंवा लांब कुर्ता यांसारख्या पोशाखांमध्ये दिसते. असे म्हटले जाते की, साराने शॉर्ट टॉप घातलेले किंवा अंगप्रदर्शन करणारे कपडे घातलेले अमृता सिंगला आवडत नाही. त्यामुळे जेव्हा सारा शॉर्ट कपडे घालते तेव्हा हे सर्व ती आपल्या सावत्र आईकडून शिकली आहे असे अमृताला वाटते. 

मात्र अमृताने या अफवांचे खंडन करत सांगितले की, मला माझ्या मुलीच्या पेहरावाबाबत कोणतीही अडचण नाही तसेच साराच्या करीनासोबतच्या नात्याबद्दल मला कोणताही राग नाही. करीनाच्या पार्टीसाठी मीच साराच्या ड्रेसला पूर्णपणे मान्यता दिली होती असेही अमृताने सांगितले होते.

अमृता या मुलाखतीत म्हणाली होती की, साराला जेव्हा जेव्हा वाटते तेव्हा ती करीनाला फोन करते. जेव्हा साराला तिचे वडील सैफ किंवा करीना यांच्याशी बोलायचे असते तेव्हा ती त्यांच्याशी फोन करून बोलते. जेव्हा साराला वाटतं की तिला करीनाशी एकट्यात बोलायचे आहे, तेव्हा सैफ जवळ नसताना ती तिला कॉल करते.

अमृताच्या या वक्तव्यामुळे तिला आपली मुलगी साराच्या करीनासोबतच्या बॉण्डिंगमुळे कोणतीही अडचण नसल्याचे स्पष्ट झाले. साराच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास अलीकडेच तिने तिच्या आगामी ‘ए वतन मेरे वतन’ या चित्रपटाची घोषणा केली. या चित्रपटात ती एका स्वातंत्र्य सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय सारा विकी कौशलसोबत लक्ष्मण उतेकर यांच्या एका चित्रपटातही दिसणार आहे.