आलियाच्या डोहाळे जेवणाचे फोटो आले समोर (See Ins...

आलियाच्या डोहाळे जेवणाचे फोटो आले समोर (See Inside pics from Alia Bhatt’s baby shower, Family and friends shower love on Mom To Be)

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सध्या आयुष्यातील सर्वात सुंदर टप्प्यातून जात आहेत. त्यांचा ‘ब्रह्मास्त्र’  चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमालीचा यशस्वी ठरला आहे आणि आता लवकरच त्यांच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. त्यामुळे दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. आलिया लवकरच आई होणार आहे.

गेले काही दिवस आलियाची सासू नीतू कपूर आणि आई सोनी राजदान तिच्यासाठी डोहाळे जेवणाची योजना आखत असल्याचे म्हटले जात होते. तेव्हापासून चाहते आलियाच्या डोहाळे जेवणाची आतुरतेने वाट पाहत होते.  काल दसऱ्याच्या दिवशी आलियासाठी डोहाळे जेवण आयोजित करण्यात आले होते.

आलिया भट्टचा डोहाळे जेवणाचा कार्यक्रम काल मुंबईत पार पडला. या कार्यक्रमाला तिच्या जवळच्या मैत्रिणी आणि कुटुंबीय एकत्र जमले होते. हा कार्यक्रम त्यांच्या मुंबईतील घरीच ठेवण्यात आला होता. आता आलियाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातील फोटो समोर आले आहेत. कार्यक्रमात ती पारंपारिक लूकमध्ये दिसली. तिने पिवळ्या रंगाचा अनारकली सूट घातला होता, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. आलियाच्या चेहऱ्यावर गरोदरपणाचे तेज स्पष्टपणे दिसत होते.

आलियाने स्वत: अजून कार्यक्रमाचे फोटो शेअर केलेले नाहीत. पण तिची सासू नीतू कपूरने हे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. फोटोत सर्व महिला मंडळ दिसत आहे. तर एका फोटोत रणबीरही दिसत आहे.

याशिवाय रिद्धिमा कपूर साहनीनेही आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये या कार्यक्रमातील दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये ती भाऊ रणबीरसोबत पोज देत आहे. तर दुसऱ्या फोटोत रिद्धिमा आलियासोबत दिसत आहे. हे फोटो शेअर करताना त्यावर डॅडी टू बी आणि मॉम टू बी असे लिहिले आहे.

आलियाची आई अभिनेत्री सोनी राजदान आणि रणबीरची आई नीतू कपूरने आयोजित केलेल्या डोहाळे जेवणात आलियाच्या मैत्रिणींसोबतच रिद्धिमा कपूर साहनी, समरा साहनी, महेश भट्ट, बबीता कपूर, अयान मुखर्जी, पूजा भट्ट, बबिता कपूर, शाहीन भट्ट, करिश्मासह अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. यांनी हजेरी लावली.