जान्हवी कपूरकडे पापाराझींनी मागितली नव्या घराची...

जान्हवी कपूरकडे पापाराझींनी मागितली नव्या घराची पार्टी, अभिनेत्री म्हणाली- गुपित होते पण तुम्ही ते उघड केले (‘Secret Tha Aapne Logon Ne Bhanda Phod Diya’ Says Janhvi Kapoor As Paparazzi Ask Her For A Party After Buying New House)

नुकतेच जान्हवी कपूरने मुंबईतील वांद्रे भागात एक डुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केले आहे, त्या अपार्टमेंटची किंमत 65 कोटी असल्याचे सांगितले जाते. अभिनेत्रीने हे नवीन घर ऑक्टोबरमध्ये खरेदी केले होते. त्यात अनेक सोयीसुविधा आहेत. जान्हवीच्या या आलिशान घरात खुली बाग, स्विमिंग पूल आणि पाच कारसाठी पार्किंग एरिया आहे. हे घर पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर आहे. अभिनेत्रीचे हे डुप्लेक्स अपार्टमेंट 8,669 स्क्वेअर फूट एवढे मोठे आहे.

जान्हवी वर्कआउट करून जिममधून बाहेर पडत होती, तेव्हा पापाराझींनी तिला नवीन घर घेतले त्यासाठीच्या पार्टीसाठी विचारले, तेव्हा अभिनेत्रीने हसत हसत सांगितले की ते गुपित होते पण तुम्ही लोकांनी उघड केले. यावर पापाराझी म्हणाले की अशा गोष्टी आमच्यापासून कशा लपू शकतात?

जान्हवीला अनेकदा जिमच्या बाहेर स्पॉट केले जाते. तिचे जिम लूकही खूप लोकप्रिय आहेत. ती पापाराझींसाठी पोझ देखील देते. अनेकदा ती त्यांच्याशी बोलते आणि विनोदही करते. जान्हवीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर ती वरुण धवन सोबत बवालमध्ये दिसणार आहे. याशिवाय ती मिस्टर अॅण्ड मिसेस माही आणि किट्टीमध्येही दिसणार आहे.

अलीकडेच जान्हवी ‘मिली’ चित्रपटात दिसली होती, तो चित्रपट मल्याळम चित्रपट हेलनचा रिमेक होता. मिलीची भूमिका जान्हवीसाठी खूप आव्हानात्मक होती, पण तिने खूप छान साकारली.

जान्हवीला काल रात्री एका रेस्टॉरंटच्या बाहेर पाहिले गेले. त्यावेळी तिने अतिशय स्टायलिश डेनिम लूक केला होता. तिने डेनिम जंपसूट घातला होता. त्यात ती खूपच सुंदर दिसत होती.