बड्या सिताऱ्यांची दडपलेली प्रेमप्रकरणे (Secret ...

बड्या सिताऱ्यांची दडपलेली प्रेमप्रकरणे (Secret Affairs Of Bollywood Celebrities)

बॉलिवूडचे बडे सितारे लपूनछपून प्रेम करतात. पण त्यांच्या उतावळ्या वागण्याने ती चव्हाट्यावर येतातच. त्यांच्या प्रेमाचा पर्दाफाश होतोच. पण इथे असे काही महाभाग आहेत, ज्यांनी आपली प्रेमप्रकरणे अशी खुबीने दडवून ठेवली की, लोकांना त्यांचा सुगावा लागला नाही. पण मांजराला वाटतं की, आपण डोळे मिटून दूध पितो म्हणजे कोणाला दिसत नाही. याच न्यायाने त्यांच्या या दडपलेल्या प्रेमाची कुणकुण लागली होतीच…

आमीर खान – पूजा भट्ट

आमीर खान आणि पूजा भट्ट यांचा प्रेमालाप फार कमी लोकांना ठाऊक आहे. कारण त्यांचं प्रेम प्रकरण मीडियाने उघडकीस आणलं नाही. ‘दिल है कि मानता नही’ या चित्रपटाचे शूटिंग चालू होते, तेव्हा या दोघांचे प्रेम जुळले आणि बहरले. त्या काळात आमीर खानचं लग्न झालं होतं, तर पूजा भट्टचे पिताजी महेश भट्ट या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. प्रेक्षकांना आमीर-पूजा ही जोडी या चित्रपटात खूप आवडली. पण काही कारणांनी या दोघांचं प्रेम फार काळ टिकलं नाही.

अनुष्का शर्मा – जोहेब युसुफ

अनुष्का आणि जोहेब यांच्या या प्रेमप्रकरणाची माहिती फारशी कोणाला नाही. कारण अनुष्काचा बॉलिवूडमध्ये प्रवेश होण्याआधीचं हे प्रकरण आहे. मात्र अनुष्का बॉलिवूडमध्ये व्यवस्थित स्थिरावली. अन्‌ तिचं व विराट कोहलीचं प्रेमप्रकरण मात्र बरंच चर्चेत आलं. पुढे दोघांनी रितसर लग्न केलं. अन्‌ आता मुलीच्या संगोपनात दोघे रमले आहेत.

दीपिका पादुकोण – निहार पांड्या

दीपिकाचं नाव तसं बऱ्याच जणांशी जोडलं गेलं आहे. पण तिचं एक लपूनछपून केलेलं प्रेम फारच कमी लोक जाणतात. कारण ही गोष्ट दीपिका बॉलिवूडची तारका होण्याआधी मॉडेलिंग करत होती, तेव्हाची आहे. दीपिका तेव्हा प्रसिद्ध नटी नव्हती, म्हणून ते दडपलं गेलं. दीपिका व निहार पांड्या, हे दोघे हिमेश रेशमिया यांच्या ‘आप का सुरूर’ या अल्बममध्ये एकत्र दिसले होते. पुढे दीपिका जसजशी बॉलिवूडमध्ये प्रगती करत गेली, तसतशी तिने निहारशी अंतर राखायला सुरुवात केली. आता दीपिकाने रणवीर सिंहशी लग्न केलं आहे. अन्‌ त्यांचा संसार सुखात चालला आहे.

रणबीर कपूर – अवंतिका मलिक

रणबीर कपूर हा तर गाजलेला प्रेमवीर आहे. कारण त्याचं नाव बऱ्याच जणींशी जोडलं गेलं आहे. त्यामध्ये दीपिका पादुकोण, कतरीना कैफ, आलिया भट्ट यांचा समावेश आहे. मात्र त्याचं अवंतिका मलिकशी चोरटं प्रेम होतं, याची फार लोकांना माहिती नाही. रणबीर आणि अवंतिका बालकलाकार म्हणून काम करत होते. पुढे त्याचं प्रेमात रुपांतर झालं. मात्र जास्त वाढलं नाही.