भजन देखील एक प्रकारचा मंत्र आहे… पुजेच्या...

भजन देखील एक प्रकारचा मंत्र आहे… पुजेच्या वेळी कापुर का लावतात? काय आहे यांमागील शास्त्रीय कारण! (Scientific Reasons Behind Hindu Traditions)

Scientific Reasons Behind Hindu Traditions

वायुमंडलाचं शुद्धीकरण करतो कापूर

पूजेच्या वेळी आरती करताना घरामध्ये कापूर जाळण्याची प्रथा वैदिक काळापासून चालत आलेली आहे. यामागचं शास्त्रीय कारण सांगायचं तर, कापूर जाळल्याने वायुमंडल शुद्ध होतं. अर्थात हवेतील हानिकारक जिवाणू नष्ट होऊन, कापराच्या सुंगधानं वातावरण सुवासिक होतं.

बीज मंत्र म्हणजे काय असतं?

कोणत्याही मंत्राचं लघूत्तम रूप म्हणजे बीज मंत्र. हे अतिशय प्रभावी असतात. बीज मंत्र केवळ एक अक्षरी असतो, परंतु यांचा प्रभाव इतका खोलवर असतो की, यात आरोग्याची गुरुकिल्ली लपलेली असते.

भजन देखील मंत्राचाच एक प्रकार

Scientific Reasons Behind Hindu Traditions

कीर्तन, प्रार्थना वा भजन यांनाही मंत्र असंच मानलं गेलं आहे. कारण योग्य लय, ताल आणि वेळेमध्ये जर भजन म्हटलं तर ते थेट आपल्यामधील आध्यात्मिक ऊर्जेस जाऊन भिडतं. यामुळे सर्व विषद्रव्यं बाहेर पडतात.

मानसिक आजारांवर मात करण्यासाठी ध्यानधारणा

संशोधनानुसार ध्यानधारणेमुळे मनातील भीती कमी होते आणि अनेक तऱ्हेच्या मानसिक रोगांपासून मुक्तता मिळते. यामुळे फोबिया, विकृत विचार, व्यसन, वेड लागणं इत्यादी समस्यांसाठी ध्यानधारणा फायदेशीर आहे.

Scientific Reasons Behind Hindu Traditions

ध्यानधारणेमुळे निराशा आणि तणाव निर्माण करणारे रसायन कमी होतं

अभ्यासांती असं सिद्ध झालं आहे की, ध्यान केल्याने इंफ्लेमेटरी रसायनं कमी होतात. ही रसायनं तणावास कारण ठरतात, तसेच नैराश्य निर्माण करतात. परंतु ध्यान केल्याने हे रसायन कमी होऊन नैराश्य देखील कमी होतं.