कपाळाला भस्म लावणे का असते शुभ ? जाणून घेऊया या...

कपाळाला भस्म लावणे का असते शुभ ? जाणून घेऊया यामागील शास्त्रोक्त कारण… (Science Behind Popular Hindu Traditions)

पूज्यनीय आणि औषधी गुणांनी युक्त आहे गंगा

गंगा नदीला आपण मातेसमान मानतो, यामागील शास्त्रोक्त कारण असं आहे की, गंगेचं पाणी हे औषधी आहे. गोमुखातून निघाल्यानंतर प्रवाही होत नदी अनेक नैसर्गिक ठिकाणं, वनस्पती यांमधून पुढे जात असते, त्यामुळे तिच्या पाण्यामध्ये जिवाणूंना मारण्याची शक्ती असते, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

बेलपत्र म्हणजे आरोग्यदायी खजिना

देवांचे देव महादेव यांना बेलपत्र प्रिय आहे, त्यांच्या पुजेमध्ये बेलपत्र हे शुभ मानलं जातं. परंतु या बेलाच्या पानाचे आरोग्यदायी उपयोग देखील आहेत. ताप व श्वसनाच्या आजारांसाठी तसेच हृदय निरोगी राहावं यासाठी बेलाच्या पानांचा काढा बहुगुणी ठरतो. तोंड आलं असल्यास बेलाची पानं चावावी. बेलपत्रामुळे शरीरातील उष्णता आणि पोटांचे आजारही दूर होतात.

कपाळावर भस्म लावण्याचे फायदे

यज्ञ झाल्यानंतर भस्म किंवा विभूती कपाळावर लावणं शुभ मानलं जातं. आज्ञा चक्रावर भस्म लावल्यामुळे शरीरातील सर्व चक्र जागृत होतात, हे यामागील शास्त्रोक्त कारण आहे. तसेच यामुळे शरीरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह अधिक चांगला होतो. भस्मामुळे शरीरातील अतिरिक्त आर्द्रता शोषली जाते आणि त्यामुळे आपल्याला सर्दी होत नाही.

रुद्राक्ष घातल्याने मेंदू आणि हृदय अधिक कार्यशील बनते

रुद्राक्षाची माळ घातल्यामुळे मेंदू आणि हृदय अधिक कार्यशील बनते, शिवाय रक्तदाब संतूलित राहतो. कारण रुद्राक्षामध्ये मेंमेडिसिनल असते. म्हणून हिंदू धर्मामध्ये रुद्राक्षाची पूजा केली जाते. हे अँटासिड आणि दाहक विरोधी देखील आहे. 

जादूची झप्पी असते आरोग्यदायी

संशोधनानुसार मिठी मारल्यामुळे आनंदी आणि आरोग्यदायी हार्मोन्स स्रवतात. एकमेकांची गळाभेट घेतल्याने ऑक्सिटोसिन हार्मोन्स लगेचच वाढतात, ज्यामुळे एकटेपणा, ताण आणि राग यांसारख्या नकारात्मक भावना नाहिशा होतात.