ब्रेस्ट साइजमुळे बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागल...

ब्रेस्ट साइजमुळे बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागलेल्या ‘नागिन’ सायंतनी घोषने सांगितला आपला कटू अनुभव… (Sayantani Ghosh opens up about being body shamed for having bigger breasts)

आजकाल बॉलिवूड आणि टेलिव्हिजन अभिनेत्री उघडपणे बॉडी शेमिंगच्या विरोधात आवाज उठवताना दिसत आहेत. आपल्याला बॉडी शेमिंगचा कसा सामना करावा लागला हे त्या मोकळेपणाने सांगू लागल्या आहेत. टीव्ही वरील नागिन सायंतनी घोष या अभिनेत्रीनेही तिच्या ब्रेस्ट साइजवरून तिला कशा अश्लील कमेंट्स ऐकाव्या लागल्या होत्या, ते सांगितले आहे. याशिवाय तिला कास्टिंग काऊचलाही सामोरे जावे लागले असल्याचे तिने म्हटले आहे. तिच्या ब्रेस्टची साइज पाहून एका महिलेने तर तिला, तुझ्या ब्रेस्टचा आकार पाहून तू खूप सेक्स करत असणार असे वाटते, असे म्हटले होते.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉडी शेमिंगवर सायंतनी मोकळेपणाने बोलली आणि तिने सांगितले की, तिच्या ब्रेस्ट साइजमुळे तिला केवळ पुरुषांकडूनच नव्हे तर महिलांकडूनही अश्लील गोष्टी ऐकायला मिळाल्या. तिने पुढे म्हटले की, ‘मी तरुणपणापासून या सगळ्याचा सामना करत आहे आणि याचा कळस म्हणजे, एकदा एक स्त्री माझ्या स्तनाचा आकार बघत म्हणाली, ‘तुझी छाती सपाट नाही, तू व्यवस्थित आहेस. तुझ्या स्तनाचा आकार पाहून असे वाटते की तू खूप सेक्स करत असणार.’ ती बाई काय सांगू पाहत होती, ते मला समजले नाही, कारण तेव्हा मी कुमारी होते. मला वाटलं, हे काय होतंय? या गोष्टींची मला भिती वाटते.’ स्त्रियांच्या स्तनांच्या आकाराबद्दल पुरुषांमध्ये इतके आकर्षण का आहे? असा मला प्रश्न पडतो.

स्तनाच्या आकारासाठी अश्लिल मेसेज पाठवणाऱ्यांना सायंतनीने सोशल मीडियावर विस्तृत पोस्ट टाकून चांगलेच फटकारले आहे. त्या पोस्टमध्ये तिने ट्रोलर्सना विचारले की, ‘आकाराने खरोखर फरक पडतो का?’ पोस्टमध्ये, सायंतनीने सांगितले होते की, एका इंटरॲक्टिव्ह सत्रादरम्यान कोणीतरी तिला तिच्या ब्राची साइज विचारली होती. त्या वेळेस त्या व्यक्तीची अनेकांनी स्तुती केली पण तिने त्या व्यक्तीची बोलती बंद केली. कोणत्याही प्रकारचे बॉडी शेमिंग वाईटच आहे, असे ती म्हणाली. सायंतनीने पुढे लिहिले की, ‘मला समजत नाही की महिलांच्या स्तनाच्या आकाराबाबत पुरुषांमध्ये इतके आकर्षण का असते. आकार काय आहे – ए कप, बी, सी वा डी? आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे आकर्षण फक्त पुरुषांनाच नाही तर स्त्रियांनाही आहे.’

सायंतनी घोषने शेवटी लिहिले, ‘आकार एवढाच महत्त्वाचा आहे तर तुमचं मन मोठं करा. ज्यामध्ये फक्त प्रेम, स्वतःवरील प्रेम, स्वाभिमान आणि इतरांबद्दल आदर असू द्या.’

सायंतनी या मुलाखतीत कास्टिंग काउचवरही खुलेपणाने बोलली. एकदा एका मोठ्या निर्मात्याने तिला सांगितले की, ‘तिने त्याच्यासोबत थोडा वेळ घालवला पाहिजे जेणेकरून ते एकमेकांना समजून घेतील आणि तो तिला भूमिकेसाठी प्रशिक्षण देऊ शकतील. यावर सायंतनी म्हणते की, आपल्याला जेव्हा अशाप्रकारचा अनुभव येतो त्यावेळेस आपण आपल्यामधेच काही कमतरता आहे का, असा विचार करू लागतो. आपल्याला पाहिल्यानंतर ही लगेचच पटेल असे समोरच्या व्यक्तीला वाटतं तेव्हा आपण कुठेतरी चुकतो की काय, असं बोलून आपण चुकीचे नसतानाही स्वतःलाच दोष देऊ लागतो.