सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर आठवड्याभरातच त्या...
सतीश कौशिक यांच्या मृत्यूनंतर आठवड्याभरातच त्यांची मुलगी वंशिकाने बंद केले आपले इन्स्टाग्राम अकाउंट(Satish Kaushik’s Daughter DELETES Her Instagram Account Less Than Week After His Death, Deletes All Her Pictures)

बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माते सतीश कौशिक यांच्या निधनाला आठवडाही उलटलेला नाही. अभिनेत्याच्या आकस्मिक निधनामुळे त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहते शोकसागरात बुडाले आहेत. सतीश कौशिक यांची 11 वर्षांची मुलगी वंशिका वडिलांचे छत्र हरपल्यामुळे खूपच एकटी पडली आहे. एवढेच नाही तर वंशिकाने इन्स्टाग्रामवरून आपले अकाउंटही डिलीट केले आहे.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते सतीश कौशिक यांच्या निधनानंतर त्यांची 11 वर्षांची मुलगी वंशिका हिने तिचे इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केले आहे. अभिनेते सतीश कौशिक यांच्या निधनाला आठवडाही उलटलेला नाही. चित्रपट निर्माते सतीश कौशिक यांच्या आकस्मिक निधनाने कुटुंब, मित्र आणि त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
वडिलांच्या निधनाने वंशिका हिला खूप वाईट वाटले आहे. वडिलांच्या निधनानंतर वंशिकाने त्यांच्या आठवणीत एक फोटो शेअर केला होता. मात्र आता तिने तिचे इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट केल्याचे दिसून येत आहे.
वंशिकाचे सोशल मीडियावर खाजगी इन्स्टाग्राम अकाउंट होते. त्यावर वंशिका पोस्ट शेअर करत असे. वंशिकाच्या अकाऊंटवर तिचे आणि तिच्या वडिलांचे काही फोटोही होते. वडिलांच्या मृत्यूपूर्वी वंशिकाने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये वंशिका तिचे वडील सतीश कौशिकसोबत दिसली होती.
सतीश कौशिक यांचे ९ मार्च रोजी दिल्लीत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते आपल्या मित्राच्या होळी पार्टीत सहभागी होण्यासाठी दिल्लीला गेले होते.