‘माझ्या पतीने १५ कोटी रुपयांसाठी सतीश कौश...

‘माझ्या पतीने १५ कोटी रुपयांसाठी सतीश कौशिक यांची हत्या केली.’ सतीश कौशिक यांच्या मित्राच्या पत्नीचा धक्कादायक खुलासा (Satish Kaushik death: ‘My husband killed Satish ji for Rs 15 cr’ Shocking revelations by Satish Kaushik’s Friend’s wife)

प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सतीश कौशिक यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. होळीच्या दिवशी सतीश कौशिक हे दिल्लीतील एका फार्म हाऊसवर पार्टीसाठी गेले होते. याच ठिकाणी त्यांची प्रकृती ढासळू लागली होती. त्यानंतर ९ मार्च रोजी त्यांचे निधन झाले. वैद्यकीय तपासात सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. अशातच आता एका महिलेने दावा केला आहे की सतीश कौशिक यांना तिच्या पतीने मारले आहे.

दिल्लीतील कुबेर ग्रुपचे विकास मालू यांच्या फार्महाऊसवर ही पार्टी ठेवण्यात आली होती. विकास मालू यांच्या पत्नीनेच कौशिक यांच्या मृत्यूमागे आपल्या पतीचा हात असल्याचा दावा केला आहे. फार्म हाऊसच्या मालकाची पत्नी सान्वी मालू यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना चिठ्ठी लिहून हा खुलासा केला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण आले आहे.

विकास आणि सतिश कौशिक यांचे १५ कोटीच्या व्यवहारावरून भांडण झाले होते. विकास आणि कौशिक दोघे जुने दोस्त होते. विदेशात एकदा कौशिक विकासकडून आपले पैसे घ्यायला आले होते. त्यावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला होता. नंतर पैसे देईन असे सांगून विकास यांनी त्यावेळी वेळ मारून नेली होती. विकास यांनीच सतीश यांना चुकीची औषधं खायला दिली असावीत जेणेकरून त्यांना पैसे द्यायची गरज पडू नये, असा आरोप सान्वीने केला आहे.

होळी पार्टीत सहभागी होण्यासाठी अभिनेते सतीश कौशिक मुंबईहून दिल्लीला आले होते. त्याचे हे फार्म हाऊस दिल्लीतील बिजवासन येथे आहे. विकास मालूवर एक वर्षाआधी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्याचा पोलीस अजूनही तपास करत आहेत.