‘ससुराल सिमर का’ फेम दीपिका कक्करने चाहत्यांना ...

‘ससुराल सिमर का’ फेम दीपिका कक्करने चाहत्यांना दिली गुड न्यूज(Sasural Simar Ka fame actress Dipika Kakar And Shoaib Ibrahim Expecting First Child, Couple Announce Pregnancy With A Cute And Unique Photo)

गेल्या काही दिवसांपासून दीपिकाच्या प्रेग्नंसीची चर्चा होती. तिच्या फोटो आणि व्हिडीओमध्ये तिचं वाढलेलं पोट दिसून येत होतं. मात्र दीपिका आणि शोएबने त्यावर मौन बाळगलं होतं. अखेर आता सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिने चाहत्यांना गुड न्यूज दिली.

‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्करने चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून दीपिकाच्या प्रेग्नंसीची चर्चा होती. अखेर तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ‘गुड न्यूज’ दिली आहे. दीपिका आणि तिचा पती शोएब इब्राहिमने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये दोघं सोबत बसले आहेत आणि त्यांच्या डोक्यावर कॅप आहे. या कॅपवर ‘मॉम’ आणि ‘डॅड’ असं लिहिलं आहे.

शोएबने फोटो शेअर करत लिहिलं, ‘तुम्हा सर्वांसोबत ही गोड बातमी शेअर करताना माझ्या मनात आनंद, कृतज्ञता, उत्साह आणि थोडा नर्व्हसनेससुद्धा आहे. आमच्या आयुष्यातील हा सर्वांत सुंदर क्षण आहे. आम्ही दोघं लवकरच आई-बाबा होणार आहोत. आमच्या बाळाला तुमच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची खूप गरज आहे.’ त्याच्या या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

ससुराल सिमर का या मालिकेमुळे दीपिका प्रकाशझोतात आली होती. सलमान खानच्या बिग बॉस १२ ची ती विजेतीदेखील ठरली आहे. दीपिकाने २०१८ मध्ये टीव्ही अभिनेता शोएबसोबत लग्न केलं. बरीच वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

दीपिकाने २०११ मध्ये ‘ससुराल सिमर का’ या मालिकेत काम करण्यास सुरुवात केली होती. या मालिकेतून तिला खूप प्रसिद्धी मिळाली. या मालिकेत काम करत असताना तिचं रौनक सॅमसनशी लग्न झालं होतं. मात्र या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. तीन वर्षांनंतर दोघांनी घटस्फोट घेतला. त्यानंतर दीपिका शोएबच्या प्रेमात पडली.