सारा अली खानला शाळेतून काढण्याची वेळ आली होती&#...

सारा अली खानला शाळेतून काढण्याची वेळ आली होती… तिच्या खोड्या ऐकाल तर खूप हसाल (Sara Ali Was About To Be Expelled From School, Knowing The Reason Will Make You Laugh)

सारा अली खान अजूनही बॉलिवूडची उमेदवारी करणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.  आपल्या खट्याळ स्वभावाने ती जास्त लोकप्रिय आहे. कारण सोशल मीडियावर तिच्या खट्याळपणाचे मासले अनेकवार दिसले आहेत.  थट्टा मस्करी करणे हा तिचा लहानपणापासूनच स्वभाव आहे. त्याची शिक्षा भोगण्याची वेळ तिच्यावर आली होती.

सारा अली खान नवाबी घराण्यातली असली तरी तिची थट्टा मस्करी करण्याची सवय इतरांसारखीच आहे. बालपणी तर ती खूपच मस्तीखोर होती.

‘ कॉफी विथ करण सीझन ७ ‘ मध्ये साराने लहानपणी केलेली मस्ती सांगितली. शाळेतल्या एका मित्रावर तिने फेविकॉलची पूर्ण पेस्ट टाकली होती. तिच्या या मस्तीने शाळा तिला काढून टाकण्यास तयार झाली होती. तिच्या आई-बाबांनी मिनतवारी करून ही शिक्षा वाचली. तिला शाळेने ताकीद दिली होती.

एक गोष्ट मात्र आहे की, ती केवळ मस्तीखोर नव्हती. तर अभ्यासात देखील हुशार होती. तिचे बाबा सैफ अली खान अभ्यासाबाबत कडक होते. अन् चांगलं शिक्षण पूर्ण केल्यानंतरच बॉलिवूडमध्ये जा , असं तिला सांगण्यात आलं होतं. त्यानुसार साराने शिक्षणात हलगर्जीपणा न करता २०१६ साली न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठातून पदवी मिळवली. या काळात ती चांगलीच अभ्यासू विद्यार्थी होती.