27 व्या वाढदिवसानिमित्त सारा अली खानने स्वत:लाच...

27 व्या वाढदिवसानिमित्त सारा अली खानने स्वत:लाच दिल्या शुभेच्छा (Sara Ali Khan Wishes Herself First On Her 27th Birthday, Pens A Sweet Post, See Photo)

बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान आज तिचा २७ वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त साराने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने स्वत:लाच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सारा अली खान सध्याची सिने इंडस्ट्रीतील टॉपची अभिनेत्री आहे. साराने लव आजकल, अतरंगी रे आणि सिंबा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियावर सुद्धा तिच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. आज साराचा २७ वा वाढदिवस आहे.

वाढदिवसानिमित्त साराने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तिने शॉर्टस् आणि चष्मा घातला आहे. या फोटोला साराने कॅप्शन देत तिने म्हटले की, “हॅपी बर्थडे सारा. नेहमी स्वतःवर प्रेम करा आणि जेव्हा तुम्ही तुमच्या शरीर, मन आणि आत्म्यासाठी वर्कआउट करायला विसरता…”

सध्या सारा अली खान न्यूयॉर्कमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. काही दिवसांपूर्वी ती आपल्या आईसोबत इटलीला फिरायला गेली होती. त्यावेळचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. त्या फोटोंसोबत तिने चार्ल्स डिकन्सचा विचार शेअर केला होता.

साराच्या पुढील कामांबद्दल बोलायचे झाल्यास ती लवकरच गॅसलाइट या चित्रपटात दिसणार आहे.