केदारनाथ यात्रेत सारा अली खानच्या जीवावर बेतलं ...

केदारनाथ यात्रेत सारा अली खानच्या जीवावर बेतलं होतं :घाईगर्दीत तिने घर गाठलं (Sara Ali Khan Was In Big Trouble During Kedarnath Yatra, Had To Return Home In A Hurry)

सारा अली खान आणि जान्हवी कपूर यांच्या मैत्रीच्या चर्चा बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेकदा रंगतात. बॉलिवूडचा इतिहास पाहता अनेकदा बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्री एकमेकींचा तिरस्कार करतात. पण जान्हवी आणि सारा मात्र याला अपवाद आहेत. त्या दोघींचं एकमेकींशी खूप घट्ट नातं आहे. त्या केवळ जिम किंवा पार्टीलाच एकत्र जातात असे नाही तर या दोन्ही अभिनेत्री सुट्टीचा आनंद घेण्यासाठी केदारनाथमध्ये एकत्र गेल्या होत्या. पण या सुट्टीत साराच्यासोबत असे काही घडले ज्यामुळे तिचा जीव धोक्यात आला.

‘कॉफी विथ करण सीझन 7’मध्ये सारा आणि जान्हवी एकत्र गेल्या होत्या. तेव्हा त्यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला तसेच काही अनुभव सुद्धा शेअर केले. जान्हवीने या चॅट शोमध्ये सांगितले की, सारा अली खानने ६ हजार रुपये वाचवण्यासाठी केदारनाथमध्ये स्वस्त हॉटेल निवडले. त्या हॉटेलची अवस्था अतिशय वाईट होती आणि त्यात तिथे एकही हिटर नव्हता.

त्यावेळी तिकडचे तापमान -७ अंश होते. अशा परिस्थितीत साराची तब्येत तिथेच बिघडायला सुरुवात झाली , तिचे ओठ निळे झाले होते. तिने उबदार कपडे घातले नव्हते असे नाही, तिने लोकरीचे खूप कपडे घातले होते. पण प्रचंड थंडी आणि ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे सारा थंडीत गारठली होती. अशा स्थितीत दोघींनीही जास्त धोका न पत्करता तातडीने मुंबईला परतण्याचा निर्णय घेतला. ती सहल आयुष्यात चांगलीच लक्षात राहील असे जान्हवीने सांगितले.

साराने पुढे सांगितले की केवळ थंडीमुळेच नाही तर डोंगर चढतानाही दोघींचा जीव अडचणीत आला होता. आम्ही भैरवनाथला जायचे ठरवले होते आणि तिथे चालण्याचा एक साधा रस्ता आहे, परंतु आम्ही हायकिंग करण्याचा निर्णय घेतला.

तिथे 85 फूट खडकांचा उतार होता, तेव्हा  जान्हवी म्हणाली चल चढू या पण मी आतून घाबरले होते आणि ते दगड सतत हलत असल्यामुळे आम्ही पडू अशी सारखी भीती वाटत होती. काही अंतर चढल्यानंतर त्या मध्येच अडकल्या. ३० मिनिटे त्या एकाच जागी फसल्या होत्या. त्यानंतर साराच्या ड्रायव्हरने त्यांना शोधून काढले आणि विशेष दलाच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली.